Anushka Sharma Hugs Virat Kohli: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) फायनल्सचा सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Dubai International Stadium) खेळवण्यात आला. या सामन्यात अगदी थाटात विजय मिळवत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडियानं (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पण, टीम इंडियासाठी हा विजय फारसा सोपा नव्हता. समोर आव्हान होतं न्यूझीलंडचं (New Zealand). अगदी शेवटपर्यंत न्यूझीलंडनं टीम इंडियाला झुंजवत ठेवलं. तर, टीम इंडियाचा धुरंधर विराट कोहलीला फक्त आणि फक्त एकाच धावेवर माघारी धाडलं. अखेर रोहित, श्रेयस, हार्दिक, केएल राहुल यांच्या धडाकेबाज खेळीनं टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचवलं. विजय मिळाल्यावर सारेच खेळाडू जल्लोष साजरा करत होते. मात्र, खऱ्या अर्थानं लाईमलाईटमध्ये होता तो विराट कोहली. त्याच्या एका कृत्यानं सर्वांचीच मनं जिंकली. जसं टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, विराटनं पत्नी अनुष्काकडे धाव घेतली.
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बऱ्याचदा टीम इंडियाच्या सामन्यासाठी उपस्थिती लावते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावेळीही अनुष्का शर्मा उपस्थित होती. अनेकदा तिची रिअॅक्शन कॅमेऱ्यात स्पॉटही झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचेही तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टीम इंडियानं सामना जिंकल्यानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल्स जिंकल्यानंतर विराट कोहली प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माकडे सर्वात आधी धावत गेला. अनुष्काही त्याच्याकडे धावते आणि दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. यानंतर, विराट अनुष्काचा हात धरतो आणि तिला खाली मैदानात घेऊन जातो. यावेळी अनुष्कानं ब्ल्यू डेनिम शर्ट वेअर केलं होतं.यासोबतच तिनं स्वतःसोबत काळ्या रंगाची बॅगही कॅरी केली होती.
चाहत्यांनी दिल्या क्युट रिअॅक्शन
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडत आहे. एका चाहत्यानं कमेंट केली आहे की, "ये सिर्फ एक मूमेंट नहीं, सुकून है...", दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली आहे की, "वाह, जीत के बाद अनुष्का और विराट का गले लगना प्योर गोल्ड जैसा है, क्रिकेट के मैदान पर चमकता सच्चा प्यार..."
याव्यतिरिक्त एका युजरनं लिहिलं आहे की, "मूव्हमेंट है भाई मूव्हमेंट..." तसेच, अनुष्का आणि विराटच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अनेकजण रेड हार्ट पोस्ट करत कमेंट करत आहेत. तसेच, सर्वांना शुभेच्छा देत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :