Happy Independence Day 2022: भारताला (india) स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली असून स्वातंत्र्याचा अमृतोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा (Indian Flag) फडकावला जात आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यादिनाच्या सेलिब्रेशनमध्ये आता परदेशी खेळाडूंही सहभागी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा (Australia) तडाखेबाज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) आणि वेस्ट इंडीजचा (West Indies) डॅरेन सॅमीनं (Daren Sammy) सोशल मीडियावर (Social Media) भारतीय तिरंग्याचा फोटो पोस्ट केला आहे. 


ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने इंस्टाग्रामच्या माध्यमातून (Instagram) भारतीय चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरनं लिहिलंय की, भारतात उपस्थित असलेल्या सर्व मित्र आणि कुटुंबीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.


डेव्हिड वॉर्नरची इन्स्टाग्राम पोस्ट
डेव्हिड वॉर्नर हा भारतात खूप प्रसिद्ध आहे. भारतील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलमध्ये (IPL) त्यानं दिर्घकाळ सनरायजर्स हैदराबादच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. आयपीएलच्या मागच्या हंगामात दिल्लीच्या संघानं त्याला विकत घेतलंय. आक्रमक फलंदाजी आणि आणि रिल्स बनवून डेव्हिड वॉर्नरनं भारतीयांचे मनं जिंकली आहेत. 



डॅरेल सॅमीची भावूक पोस्ट
डेव्हिड वॉर्नरसह वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेल सॅमीनंही सोशल मीडिया द्वारे भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॅरेन सॅमीनं टी-20 विश्वचषक ट्रॉफीसह फोटो शेअर करत लिहलंय की, "भारताला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतातच मी माझ्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे."



स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा विशेष पर्व स्वातंत्र्याचा अमृतोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे आणि देशाचा कानाकोपरा तिरंग्यानं व्यापला आहे. स्वातंत्र्याच्या या सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे सदस्यही सहभागी झाले असून चाहत्यांचे अभिनंदन करत आहेत. अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर आपला प्रोफाईल फोटोही बदलून त्यात तिरंगा लावला आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मासह इतर खेळाडूंनी ट्विटर, इन्स्टाग्रामवर आपले फोटो बदलले आहेत.


हे देखील वाचा-