James Anderson: न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून येत्या 23-27 जून दरम्यान दोन्ही संघातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून इंग्लंडच्या संघानं 2-0 नं आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाल क्लीन स्वीप देण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. यापूर्वीच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळं तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तो पायाच्या दुखापतीनं ग्रस्त असल्याचंही सांगितलं जातंय. 


डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय अँडरसनच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे. अशा स्थितीत त्याला तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकावं लागणार आहे. पुढे त्याचं वेळापत्रक व्यस्त आहे. ज्यामध्ये भारताविरुद्धच्या कसोटीचाही समावेश आहे.


इंग्लंडचा संघ 2-0 नं आघाडीवर
न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडच्या संघानं 2-0 नं अशी आघाडी घेतलीय. तिसऱ्या कसोटी सामन्यात अँडरसनच्या जागेवर स्टुअर्ट ब्रॉडला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात येत्या 23 जूनपासून सुरुवात होणार आहे. हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे.


अँडरसनचा दमदार प्रदर्शन
अँडरसनची दुखापत हा इंग्लंड संघासाठीही चिंतेचा विषय आहे. कारण तो या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अँडरसनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आलं होतं. मात्र, त्यानं पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केलंय.अँडरसननं नुकतंच कसोटी क्रिकेटमध्ये 650 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. 


हे देखील वाचा-