लंडन : इंग्लंडच्या कसोटी (England Test Team) संघातील अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) ला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळं त्याला संघाबाहेर राहावं लागलं आहे. आगामी श्रीलंका मालिकेसाठी बेन स्टोक्स ऐवजी ओली पोपला कर्णधारपद देण्यात आलं आहे. बेन स्टोक्स इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड ट्रॉफीत जखमी झाला होता. 11 ऑगस्टला स्टोक्स जखमी झाला होता. 


बेन स्टोक्स द हंड्रेड ट्रॉफीमध्ये नॉर्दन सुपरचार्जर्स यांच्याकडून खेळतो. मँचेस्टर ओरिजनल संघाविरुद्ध ओल्ड ट्रॅफोर्ड विरूद्धच्या सामन्यात 11 ऑगस्टला तो दुखापतग्रस्त झाला होता.  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकल्यानं बेन स्टोक्स आता पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका ऑक्टोबरमध्ये होणार आहे. 



एखाद्या अष्टपैलू खेळाडूसमोर फिटनेस राखणं आव्हानात्मक असतं. बेन स्टोक्सनं वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेत गोलंदाजी सुरु केली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळं बेन स्टोक्सनं 2023 च्या वर्ल्ड कपनंतर त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपमधून कसोटी मालिकेसाठी स्टोक्सनं माघार घेतली होती. इंग्लंडच्या संघासाठी युवा ओली पोपच्या नेतृत्त्वात श्रीलंकेविरुद्दची मालिका आव्हानात्मक असेल. इंग्लंडच्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला 21 ऑगस्टला सुरुवात होणार आहे.


इंग्लंडनं काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवला होता. आता इंग्लंड पुढं श्रीलंकेचं आव्हान असेल. श्रीलंकेनं भारताला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पराभूत केलं होतं. यामुळं श्रीलंकेचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. त्यामुळं श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील मालिका रंगतदार होणार आहे. 


इंग्लंड श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तान विरुद्धची मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात देखील खेळणार आहे. 


इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 21 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्या मालिकेपूर्वी बेन स्टोक्सला संघाबाहेर जावं लागलं आहे. मंगळवारी लीडसमध्ये बेन स्टोक्सची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये बेन स्टोक्सस फिट नसल्याचं स्पष्ट झाल्यानं संघाचा कॅप्टन ओली पोप असेल. याशिवाय संघात इतर बदल करण्यात आलेली नाहीत. 


इंग्लंड पाकिस्तानचा दौरा ऑक्टोबरमध्ये करणार आहे. या मालिकेत दोन्ही संघात मुल्तान, कराची आणि रावळपिंडीत सामने होणार आहेत.


दुसरीकडे श्रीलंका संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून इयान बेलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर, श्रीलंका क्रिकेट संघाचा अंतरिम प्रशिक्षक म्हणून सनथ जयसूर्या भारताविरुद्धच्या मालिकेतून त्यांची कामाची झलक दाखवून दिली आहे.


संबंधित बातम्या :



Team India: बीसीसीआयकडून मोठी अपडेट, भारताच्या बांगलादेश अन् इंग्लंड मालिकेतील सामन्यांच्या आयोजनात मोठे बदल, जाणून घ्या