नवी दिल्ली :भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी क्रिकेट मालिकांच्या आयोजनातील बदलांबाबत माहिती दिली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेबाबत आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील बदलांबाबत बीसीसीआयनं माहिती दिली आहे. भारत आणि बागंलादेश यांच्यातील पहिली टी 20 मॅच 6 ऑक्टोबरला धर्मशालाच्या मैदानावर होणार होती. मात्र, मैदानाच्या दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या कामासाठी हा सामना ग्वाल्हेरमध्ये आयोजित केला जाणार आहे. ग्वाल्हेरमध्ये होणारी मॅच ही श्रीमंत माधवराव सिंधीया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत 2010 मध्ये सचिन तेंडुलकरनं या मैदानावर द्विशतक झळकावलं होतं. त्यानंतर पहिली मॅच होणार आहे.
बीसीसीआयनं भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेच्या आयोजनाबाबत काही बदल केले आहेत. यापूर्वी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत होणार होता. मात्र, आता पहिला टी 20 सामना कोलकाता येथं होणार आहे. तर, दुसरा टी 20 सामना चेन्नईत होणार आहे. मात्र, सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला नाही.
भारत आणि बांगलादेश मालिकेचं वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिली कसोटी : 19 सप्टेंबर 2024 ते 23 सप्टेंबर 2024, चेन्नई
दुसरी कसोटी : 27 सप्टेंबर 2024 ते 1 ऑक्टोबर 2024, कानपूर
टी 20 मालिका
पहिला टी 20 सामना : 6 ऑक्टोबर 2024, ग्वाल्हेर
दुसरा टी 20 सामना : 9 ऑक्टोबर 2024, दिल्ली
तिसरा टी 20 सामना : 12 ऑक्टोबर 2024, हैदराबाद
भारत इंग्लंड मालिका
पहिला टी 20 सामना : 22 जानेवारी 2025 ,कोलकाता
दुसरा टी 20 सामना : 25 जानेवारी 2025, चेन्नई
तिसरा टी 20 सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट
चौथा टी 20 सामना : 31 जानेवारी 2025, पुणे
पाचवा टी 20 सामना : 02 फेब्रुवारी 2025, मुंबई
भारत विरुद्ध इंग्लंड, एकदिवसीय सामने
पहिला एकदिवसीय सामना : 6 फेब्रुवारी 2025, नागपूर
दुसरा एकदिवसीय सामना : 9 फेब्रुवारी 2025, कटक
तिसरा एकदिवसीय सामना :12 फेब्रुवारी 2025, अहमदाबाद
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघानं श्रीलंकेविरुद्ध टी 20 मालिका आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं श्रीलंकेला 3-0 असं पराभूत केलं होतं. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याची ही पहिलीच मालिका होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताच्या संघाला वनडे मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. तर, श्रीलंकेनं भारताला 2-0 नं पराभूत केलं होतं. भारत आणि श्रीलंकेतील पहिली मॅच ड्रॉ झाली होती.
संबंधित बातम्या :