Ben Stokes News : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू आणि कसोटी फॉरमॅटचा कर्णधार बेन स्टोक्सच्या घरात चोरी झाल्याची बातमी समोर आली आहे. स्टोक्सने त्याच्या घरात चोरी झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या स्टार क्रिकेटरने सांगितले की, चेहऱ्यावर मंकी कॅप घातलेल्या चोरट्याने त्याच्या घरातून महागडे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला.
17 ऑक्टोबर रोजी बेन स्टोक्सच्या घरात चोरट्यांनी चोरी केली होती. या दिवशी इंग्लंड क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. जेथे मुलतानमध्ये दुसरा कसोटी सामना खेळण्यात व्यस्त होता. आणि त्याच दिवशी रात्री काही चोरट्यांनी स्टोक्सच्या घरावर चोरी केला. जिथे स्टोक्सने सांगितले की चोरांनी 3 चेन, एक लॉकेट, त्याच्या पत्नीची मौल्यवान हँडबॅग तसेच त्याने जिंकलेले एक पदक घेऊन गेले.
बेन स्टोक्सच्या घरावर दरोडा
इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने स्वत: आपल्या घरातील चोरीची माहिती शेअर करत आपल्या चाहत्यांना मदतीचे आवाहन केले. इंग्लंडच्या या स्टार खेळाडूने सांगितले की, त्याची पत्नी क्लेअर रॅडक्लिफ आणि दोन मुले लेटन आणि लिबी त्या रात्री घरात झोपले होते. चोरट्यांनी सामान चोरी करून नेले पण सुदैवाने पत्नी किंवा मुलांना कोणतीही हानी केली नाही.
स्टोक्सने या चोरीची माहिती त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि Instagram वर शेअर केली आणि लिहिले, 17 ऑक्टोबर रोजी डरहमच्या कॅसल ईडन भागात काही चेहऱ्यावर मंकी कॅप घातलेल्या लोकांनी त्याच्या घरात घुसून चोरी केली. ते बरेच दागिने, इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले, यापैकी अनेक गोष्टी माझ्या कुटुंबासाठी विशेष भावनिक महत्त्वाच्या आहेत. त्यांनी माझ्या पत्नी आणि मुलांचे काही नुकसान केले नाही याबद्दल देवाचे आभार मानतो. या घटनेमुळे मोठा परिणाम झाला आहे. मी येथे काही गोष्टींचे फोटो अपलोड करत आहे. आशा आहे की हे ओळखण्यात मदत करा.
हे ही वाचा -