IPL Mini Auction: आयपीएल 2023 ची (IPL 2023) तयारी जोरात सुरू आहे. सर्व फ्रँचायझींनी मिनि ऑक्शनपूर्वी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2023 साठी येत्या 23 डिसेंबर 2023 रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. परंतु, अनेक फ्रँचायझींनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तारखेत बदल करण्याची विनंती केली होती. मात्र, बीसीसीआय आयपीलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोणताही बदल केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.
इनसाईटस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की,"आम्हाला माहिती आहे की, अनेक फ्रँचायझींतील काही अधिकारी ख्रिसमसच्या सुट्टीवर असतील. पण तरीही आयपीएल मिनी ऑक्शनच्या तारखेत बदल होण्याची शक्यता नाही. मिनी ऑक्शनच्या तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकचा समावेश आहे. तारखेत बदल केल्यानंत पुन्हा एकदा सर्वकाही सेट करावं लागेल. ज्यामुळं तारखेत बदल करण्याची शक्यता कमी आहे."
फ्रँचायझींची बीसीसीआयकडं विनंती
आयपीएलमधील अनेक फ्रँचायझींनी आयपीएलच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी बीसीसीआयकडं विनंती केली होती. ज्यामुळं मिनी ऑक्शनमध्ये त्यांच्या फ्रँचायझीतील जास्तीत जास्त अधिकारी भाग घेऊ शकतात. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण आयपीएल मिनी ऑक्शनच्या तारखेत बदल केला जाणार नसल्याची माहिती समोर आलीय.
या खेळाडूंवर लागणार मोठी बोली
सॅम करन, बेन स्टोक्स, केन विल्यमसन, अॅलेक्स हेल्स, आदिल रशीद, कॅमेरून ग्रीन आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये सहभागी होती. यावेळची मिनी ऑक्शन खूपच रंजक असणार आहे. कोणता संघ कोणत्या खेळाडूवर बोली लावतो? हे पाहावं लागेल. विशेष म्हणजे, मिनी लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी एकूण 163 खेळाडूंना रिटेन करण्यात आलंय. तर, एकूण 85 खेळाडूंना रिलीज करण्यात आलं.
हे देखील वाचा-