BCCI New Selection Committee: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या नव्या निवड समितीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारिख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला आतापर्यंत एकूण 80 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात नवीन निवड संघाची घोषणा केली जाईल. 


या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे उमेदवार लक्ष्मण शिवरामकृष्णनला हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ निवड समित्यांसाठी एका विभागातून दोन निवडकर्त्यांची नियुक्ती करण्याचा बोर्डाचा विचार नाही. तमिळनाडूचे माजी क्रिकेटपटू शरथ श्रीधरन सध्या ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष आहेत.


डिसेंबरमध्ये घोषणा होण्याची शक्यता
दक्षिण विभागातून येणारा भारताचा माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन या शर्यतीत आघाडीवर आहे.परंतु, त्याच भागातील रहिवाशी असलेले  तामिळनाडूचा माजी क्रिकेटपटू शरथ श्रीधरननं शिवरामकृष्णन यांची डोकेदुखी वाढवलीय.शिवरामकृष्णन गेल्या वेळी देखील निवड समितीमध्ये सामील होण्यात आघाडीवर होते. त्यावेळी त्यांना  एन श्रीनिवासन यांचाही पाठिंबा मिळाला होता. पण त्यावेळी चेतन शर्माला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांची साथ मिळाली आणि ते निवड समितीचे अध्यक्ष झाले.


बीसीसीआयच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष
दरम्यान, सौरव गांगुली अध्यक्षच्या पदावरून पायउतार झाल्यानंतर नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरेल. रॉजर बिन्नी आणि श्रीनिवासन यांचे चांगले संबंध आहेत. यामुळं नियमांत बदल करण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हेतर, या पदासाठी भारताचा माजी स्टार गोलंदाज अजिक आगरकरदेखील अर्ज करण्याची शक्यता आहे. जर अजित आगरकरनं या पदासाठी अर्ज केल्यास त्याची अध्यक्षपदी निवड होऊ शकते. बीसीसीआय कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते? याकडं सर्वांच लक्ष लागलंय. 


निवड समीतीच्या अध्यक्षपदासाठी अटी
1) अर्जदारानं सात कसोटी सामन्यात देशात प्रतिनिधित्व केलेलं असावं किंवा
2) 30 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने  किंवा
3) 10 एकदिवसीय आणि 20 प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणं गरजेचं.


नवीन निवडकर्त्यांवर कोणती मुख्य जबाबदारी असणार?
- प्रत्येक प्रकारच्या संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे
- मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करा
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळ पाहण्यासाठी प्रवास करा
- संघ निवडीवर मीडियाला संबोधित करा
- योग्य आणि पारदर्शक पद्धतीने शक्य तितका सर्वोत्तम संघ निवडा


हे देखील वाचा-