IND vs NZ 2nd ODI:  पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द झालाय. जवळपास तेरा षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर पाऊस थांबलाच नाही. पंचाकडून  सामना रद्द करण्यात आला.  यासह टीम इंडियाच्या नावावर आगळावेगळा विक्रम झालाय. वन डे क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा ४२ वा सामना रद्द झालाय. हे इतर संघाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. टीम इंडियचा प्रत्येक २५ वा एकदिवसीय सामना कोणत्या ना कोणत्या कारणानं रद्द झालाय.  


कोणत्या संघाचे किती सामने रद्द झाले? 
टीम इंडियाचे आतापर्यंत ४२ एकदिवसीय सामने रद्द झाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंड संघाचे ४१ सामना रद्द झाले आहेत. श्रीलंका संघाचे ३८, ऑस्ट्रेलिया  ३४, इंग्लंड ३०, वेस्टविंडिज ३०, दक्षिण आफ्रिका २१, पाकिस्तान २०, आयरलँड १०, बांगलादेश सात आणि अफगाणिस्तान संघाचे तीन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत.  


भारताचे कुणाविरोधात किती सामने रद्द झाले?
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताचे श्रीलंका संघाविरोधात सर्वाधिक ११ सामने रद्द झाले आहेत. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाविरोधात दहा, न्यूझीलंडविरोधात सहा, पाकिस्तानविरोधात चार, वेस्टविंडिजविरोधात चार, इंग्लंडविरोधात तीन, दक्षिण आफ्रिकाविरोधात तीन आणि बांगलादेशविरोधात एक सामना रद्द झालाय.  


कोणत्या कारणामुळे रद्द झाले सामने?
पावसाच्या व्यत्ययामुळे सामने रद्द झालेच आहेत. त्याशिवाय दगडफेक, खराब खेळपट्टीपर्यंतच्या कारणामुळे सामने रद्द झाले आहेत. 1998 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेला सामना प्रेक्षकांमुळे रद्द करावा लागला होता.  1997 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यात फक्त १८ चेंडूचा खेळ झाला होता.


...तर, मालिका बरोबरीत सुटेल  -
IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय महत्वाचा होता. या मालिकेत पहिल्या सामन्यात टीम इंडियाला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासह टीम इंडिया 1-0 नं पिछाडीवर आहे. हॅमिल्टन येथील सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न होता. पण पावसामुळं हा रद्द करण्यात आलाय. शेवटचा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये होणार आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळवला तर, मालिका बरोबरीत सुटेल. जर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पावसानं गोंधळ घातल्यास मालिका न्यूझीलंडच्या नावावर होईल.