Cricket News: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आयसीसीमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांना आयसीसीच्या पुरुष क्रिकेट समितीचे सदस्य मंडळ प्रतिनिधी बनवण्यात आले आहे. आयसीसीच्या रविवारी झालेल्या तिमाही बैठकीत याची घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बोर्डाने रविवारी आपले अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना ऑक्टोबरच्या अखेरीस त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी तयार केले, ज्यामुळे आयसीसीला नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल. यात भारतीय क्रिकेट बोर्ड मोठी भूमिका बजावू शकते. 


रमीझ राजाला धक्का 


या बैठकीत एका महत्त्वपूर्ण निर्णयात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांचा चार देशांच्या स्पर्धेचा प्रस्ताव बोर्डाने एकमताने फेटाळला. यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामने होण्याची शक्यता संपुष्टात आली.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) रविवारी दुबईत संपन्न झालेली दोन दिवसीय बोर्ड बैठक चांगलीच ठरली. कारण बार्कले ऑक्टोबरपर्यंत अध्यक्षपदी राहिल्याने भारताला या पदासाठी योजना तयार करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.


आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "बार्कले यांच्या फेरनामांकनावर कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु ते ऑक्टोबरच्या अखेरीस अध्यक्ष म्हणून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. नवीन अध्यक्ष नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया नोव्हेंबरमध्येच सुरू होतील.'' यापूर्वी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज जून महिन्यात होणार होते, मात्र सदस्य मंडळांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यात बदल करण्यात आला.


हे देखील वाचा-