एक्स्प्लोर

BCCI on Gautam Gambhir : प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरची सुट्टी होणार?, अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?

Gautam Gambhir News Marathi : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याभोवती सुरू असलेल्या अटकळींवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रतिक्रिया दिली आहे.

BCCI on Gautam Gambhir Test Coaching Future : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याभोवती सुरू असलेल्या अटकळींवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, गंभीर यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभवानंतर, बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने माजी भारतीय फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत चर्चा केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

लक्ष्मण यांच्याशी चर्चा झाली होती का?

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गंभीर यांचा प्रशिक्षक म्हणून रेकॉर्ड चांगला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने एक आयसीसी आणि एक एसीसी ट्रॉफी जिंकली आहे. मात्र तगड्या देशांविरुद्ध 10 कसोटी सामने गमावल्यानंतर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये गंभीर यांच्या प्रशिक्षक म्हणूनच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

वृत्तसंस्था पीटीआयच्या अहवालानुसार, बीसीसीआयमधील महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका व्यक्तीने अनौपचारिकरीत्या व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी संवाद साधून, ते लाल चेंडूच्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास इच्छुक आहेत का, याची चाचपणी केली होती. मात्र पुढे असे समोर आले की, लक्ष्मण सध्या बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये हेड ऑफ क्रिकेट या पदावर समाधानी आहेत.

बीसीसीआयने भूमिका केली स्पष्ट 

गंभीरबाबत आता सैकिया यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले, “ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. काही प्रतिष्ठित माध्यमांनीही ती पसरवली असली, तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. बीसीसीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही पूर्णपणे मनघडंत कथा आहे. यात कोणतीही सत्य नाही. ही बातमी तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची आणि निराधार आहे, एवढेच मी स्पष्टपणे सांगू शकतो.”

2027 पर्यंत आहे गंभीर यांचा कार्यकाळ

गौतम गंभीर यांचा बीसीसीआयसह असलेला करार 2027 मधील एकदिवसीय विश्वचषकाच्या समाप्तीपर्यंत आहे. मात्र, बीसीसीआयच्या गोटात अद्यापही यावर चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत होता की, जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) 2025–27 या चक्रातील उर्वरित नऊ कसोटी सामन्यांसाठी लाल चेंडूच्या संघाचे नेतृत्व करण्यास गंभीर योग्य आहेत की नाही.

भारताने इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका 2–2 अशी बरोबरीत संपवली होती. 2026 मध्ये भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत, तर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. त्यानंतर जानेवारी–फेब्रुवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच कसोटी सामन्यांची महत्त्वाची मालिका खेळली जाणार आहे. मात्र, सैकिया यांच्या वक्तव्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, गौतम गंभीर यांना प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.

हे ही वाचा -

Coach Mahbub Ali Zaki Dies : खेळ सुरू होण्याआधीच काळजावर घाव! मैदानावर कोचचा मृत्यू, क्रिकेटविश्व स्तब्ध, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Embed widget