Dona Ganguly : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची पत्नी आणि प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना डोना गांगुली ही चिकुनगुनियाने त्रस्त असून   तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखलं करण्यात आलं आहे. डोना गांगुली मागील काही दिवसांपासून खोकला आणि घसादुखीमुळे आजारी होती. यानंतर मंगळवारी डोनाची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिला तात्काळ कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  


बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांची पत्नी डोना गांगुलीला चिकुनगुनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सौरव गांगुलीचे वडील स्नेहाशिष गांगुली यांनी बुधवारी सांगितले की, डोनाची प्रकृती स्थिर आहे आणि संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत आहे. त्याचवेळी डोनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा सौरव गांगुली रुग्णालयात होता. प्रसिद्ध डॉक्टर सप्तर्षी बसू यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.


कोण आहे डोना गांगुली?


डोना गांगुली, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुलीची पत्नी आहे. तसच ती, एक भारतीय ओडिसी नृत्यांगना आहे. तिचा जन्म 22 ऑगस्ट 1976 रोजी कोलकाता येथे झाला. डोना ही सौरवची बालपणीची मैत्रीण होती. दोघांनी 1997 मध्ये लग्न केले. दोघांचेही कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते, त्यानंतर दोघांनीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केले. नंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी या नात्याला सहमती दर्शवली आणि दोघांनी 1997 मध्ये औपचारिक विवाह केला. त्याच वेळी, दोघांनाही एक मुलगी आहे जिचा जन्म 2001 मध्ये झाला. सौरव आणि डोनाच्या मुलीचे नाव सना आहे. डोना दीक्षा मंजरी नावाने डान्स स्कूलही चालवते. नृत्याव्यतिरिक्त डोना शाळेत योगा, ड्रॉइंग, कराटे आणि पोहण्याचे प्रशिक्षणही देते.


हे देखील वाचा-