BCCI Central Contract List 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच आगामी वार्षिक वर्षासाठी केंद्रीय करार यादी जाहीर करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यांकन केल्यानंतर बोर्ड यादी जाहीर करेल. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच ही यादी जाहीर करण्यात आली होती, परंतु यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे ती लांबली. गेल्या वर्षी बीसीसीआयच्या करार यादीत समाविष्ट असलेले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग न घेतल्यामुळे यावेळी यादीतून बाहेर पडू शकतात.


बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून 'हे' खेळाडू होणार बाहेर 


आवेश खान, रजत पाटीदार, केएस भरत हे खेळाडू यावेळी बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतात. गेल्या वर्षी तिन्ही खेळाडूंना 'सी ग्रेड'मध्ये ठेवण्यात आले होते. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट झाल्यानंतरही रजत पाटीदारने गेल्या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. पण, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या गेल्या आवृत्तीत शानदार कामगिरी केली आणि तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, पण त्याला भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेत स्थान मिळाले नाही. यावेळी, आयपीएलमध्ये (IPL 2025) आरसीबीचे नेतृत्व करणारा रजत पाटीदार बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतो.


गोलंदाज आवेश खान देखील केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतो. 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 6 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या. त्याने 2023 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यामुळे आवेश खान यादीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. केएस भरतही यादीतून वगळले जाऊ शकते, त्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.


शार्दुल ठाकूरला बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतूनही बाहेर जाऊन शकतो. पण, रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड होऊ शकते. तो यादीत आपले स्थान वाचवू शकेल की नाही हे पाहणे बाकी आहे. रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे तोही यादीतून बाहेर पडेल.


श्रेयस अय्यरला जागा मिळणार जागा


गेल्या वर्षी, केंद्रीय करार यादीतून वगळलेल्या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर हे एक मोठे नाव होते. देशांतर्गत क्रिकेट गांभीर्याने न घेतल्यामुळे त्याला वगळण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्याच्या शानदार कामगिरीनंतर आता त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीत समाविष्ट करू शकते.


हे ही वाचा -


New Zealand T20I squad vs Pak : फायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंड संघात मोठी उलथापालथ! थेट बदला कर्णधार, रचिन रवींद्र अन् ग्लेन फिलिप्सलाही दाखवला बाहेरचा रस्ता