Inzamam-ul-Haq slams Sunil Gavaskar : रविवारी न्यूझीलंडला हरवून भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानने भूषवले, तरी अंतिम सामना दुबईमध्ये खेळवण्यात आला होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर भारतात आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे काही पाकिस्तानी खेळाडूंना मिरची झोंबली. अनेक पाकिस्तानी खेळाडूंना वाटले होते की, न्यूझीलंड संघ हे विजेतेपद जिंकेल पण टीम इंडियाने त्यांना तोंडावर पाडले. 


बरं, दुबईतील अंतिम सामन्यात पीसीबीचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे काही खेळाडू संतापले. आता या स्पर्धेनंतर इंझमाम उल हक भडकला आहे आणि त्याने सुनील गावसकरवर गंभीर आरोप केले आहेत. इंझमाम म्हणाला की, एकदा गावसकरने पाकिस्तानविरुद्ध खेळायचे नव्हते म्हणून शारजाहहून पळाले होते.


इंझमाम-उल-हकने गावसकरांना दिला सल्ला


पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी गावसकर यांना बोलताना शब्द जरा जपून वापरा असा सल्ला दिला. खरंतर गावसकर म्हणाले होते की, भारताचा बी संघही पाकिस्तानपेक्षा तगडा आहे. या विधानाबाबत इंझमाम म्हणाला, 'भारताने सामना जिंकला, ते चांगले खेळले, पण श्री गावसकर यांनी आकडेवारीकडेही जरा लक्ष द्यावे. एकदा तुम्हीच पाकिस्तानविरुद्ध खेळायचे नाही, म्हणून शारजाहातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहे, आमचा ज्येष्ठ आहे. आम्ही तुझा आदर करतो, पण कोणत्याही देशाबद्दल असे बोलणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या संघाचे कितीही कौतुक करू शकता, पण इतर संघांवर अशा टिप्पण्या करणे चांगले दिसत नाही.


इंझमाम पुढे म्हणाला, 'त्यांनी आकडेवारी पाहावी, आणि त्यांना कळेल की पाकिस्तान कुठे उभा आहे.' त्याने असे विधान केल्याचे मला खूप वाईट वाटते. ते एक महान आणि मोठे क्रिकेटपटू आहे, परंतु अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे ते त्याचे नुकसान करत आहे. त्याने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे.


गावसकर यांनी पाकिस्तानबद्दल नेमकं काय म्हणाले?


एका वादग्रस्त विधानात गावसकर म्हणाले होते की, भारताचा बी संघही पाकिस्तानला आव्हान देऊ शकतो. ते म्हणाले होते की, 'मला वाटतं भारताची बी टीम पाकिस्तानला नक्कीच अडचणीत आणू शकते.' मला सी संघाबद्दल खात्री नाही, पण बी संघालाही सध्याच्या फॉर्ममध्ये पाकिस्तानला हरवणे खूप कठीण जाईल.


हे ही वाचा -


Champions Trophy Prize Money : खराब कामगिरी, सगळीकडून टीका, तरी पाकिस्तान संघावर ICC मेहरबान, कोट्यावधी रुपयांचे बक्षीस जाहीर