एक्स्प्लोर

अर्शदीप सिंगची ब्लॉगिंग कायमची बंद; फ्लाइटमधील चहलच्या धुराच्या व्हिडिओनंतर BCCIचा संताप, IPL मधील सर्वांत मोठी अ‍ॅक्शन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबाबत कठोर निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबाबत कठोर निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएल 2026 मधील उर्वरित सामन्यांदरम्यान अर्शदीपने सोशल मीडियावर ब्लॉगिंग करू नये, अशा सूचना बोर्डाने दिल्या आहेत. मैदानावरील मजेशीर क्षण आणि सहकाऱ्यांसोबतच्या हलक्या-फुलक्या गप्पा व्लॉगद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे अर्शदीप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला होता. मात्र आता त्याच्याच या छंदावर बीसीसीआयने लगाम घातली आहे.

अर्शदीप सिंगची ब्लॉगिंग कायमची बंद

या निर्णयामागे अर्शदीपचे ब्लॉगिंग नसून, त्याच्या एका व्हिडिओमध्ये नकळत कैद झालेली वादग्रस्त क्लिप असल्याचे सांगितले जात आहे. अहमदाबादहून हैदराबादला जात असताना अर्शदीपने एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याचा सहकारी आणि अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल कथितरित्या फ्लाइटमध्ये वेपिंग करताना दिसल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांकडून चहलवर टीकेची झोड उठली आणि त्यानंतर बीसीसीआयला हस्तक्षेप करावा लागला.

फ्लाइटमधील चहलच्या धुराच्या व्हिडिओनंतर BCCIचा संताप

चहलसाठी ही परिस्थिती अधिकच अडचणीची ठरत आहे. कारण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याने स्वतःच्या फिटनेसबाबत आपण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले होते. मात्र फ्लाइटमध्ये वेपिंग करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा नियमांसोबतच खेळाडूंच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीसीसीआयच्या मते, अशा प्रकारचे व्हिडिओ संघाच्या शिस्तीवर सार्वजनिकरित्या नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळेच अर्शदीपला व्लॉगिंगपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते.

विशेष म्हणजे, यंदाच्या आयपीएल हंगामात वेपिंगशी संबंधित हा दुसरा मोठा वाद ठरला आहे. याआधी रियान परागहाही अशाच प्रकरणात अडचणीत सापडला होता. मुल्लांपूर येथे पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान पराग ड्रेसिंग रूममध्ये वेपचा वापर करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. या शिस्तभंगाच्या प्रकारानंतर बीसीसीआयने त्याच्यावर सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंडाची कारवाई केली होती.

हे ही वाचा -

बीसीसीआय लवकरच भाकरी फिरवणार, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन हटवणार; कोण बनणार भारताचा नवा कॅप्टन?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget