Team India squad for NZ Tests : मुंबईकर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. तर उपकर्णधार म्हणून चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. विश्वचषकानंतर विराट कोहलीनं आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचं नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आलाय. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. न्य़ूझीलंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली भारतीय संघात परतणार आहे. त्यानंतर करणधारपदाची सुत्रे विराट कोहलीकडे सोपवण्यात येणार आहेत. 


श्रेयस अय्यरचं कसोटी पदार्पण?
मुंबईकर श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीसाठी उतरु शकतो. सलामीवीर म्हणून शुबमन गिल, राहुल आणि मयांक यापैकी दोन जणांची वर्णी लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुजाराचा क्रमांक लागतो. चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरचं स्थान पक्कं मानलं जात आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यानंतर श्रेयस अय्यर कसोटीत पदार्पण करणार का? हे पाहणं आत्सुक्याचं ठरणार आहे. पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे खेळणार आहे. अष्टपैलू म्हणून जाडेजा, अश्निन, अक्षर पटेल आणि जयंद यादव यांचा समावेश करण्यात आलाय. प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असणार आहे. 


कोणत्या खेळाडूंना दिला आराम?
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं शुक्रवारी न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी मालिकेच्या संघाची घोषणा केली. चॅम्पियन ट्रॉफीपासून भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत आहे. त्याचा परिणाम विश्वचषकातही दिसून आला. त्यामुळे काही सिनिअर खेळाडूंना आराम दिलाय. यामध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी यांचा समावेश आहे. 






वेळापत्रक –
टी-20 विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारतात टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी येणार आहे.  17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी20 मालिका होणार आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. 3 डिसेंबरपासून मुंबई येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली कर्णधारपदाची सुत्रं सांभाळणार आहे.


पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ –


अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेअस अय्यर, वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), के. एस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा,आर.अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण