Bangladesh Squad For T20 World Cup 2024: आगामी 2 जूनपासून आयसीसी टी-20 विश्वचषकाची (ICC T-20 World Cup 2024) स्पर्धा रंगणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास बहुतेक संघांनी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. आज बांगलादेश क्रिकेट संघाने टी -20 विश्वचषकासाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. (Bangladesh Announce Squad For T20 World Cup 2024) 


बांगलादेशचा संघ नजमूल हुसैनच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत उतरणार आहे. अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनकडे (Shakib Al Hasan) कर्णधार पदाची धूरा देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र नजमुल हुसेन शांतो  कर्णधारपद सांभाळणार आहे. तर तस्किन अहमदकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. 


संघ जाहीर होण्याआधी बांगलादेशने झिम्बाब्वेसोबत 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली. या मालिकेत बांगलादेशने 4 सामन्यात विजय मिळवला, तर शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करायला लागला. झिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेत देखील नजमुल हुसेन शांतोकडेच कर्णधार पद देण्यात आले होते. 


टी-20 विश्वचषकात बांगलादेशचा पहिला सामना 7 जून रोजी होणार आहे. श्रीलंकाविरुद्ध हा सामना रंगेल. बांगलादेशचा समावेश ग्रुप B मध्ये आहे. तसेच बांगलादेशचा दुसरा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होईल. 10 जूनला न्यूयॉर्क मैदानावर हा सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. तीसरा सामना 13 जूनला नेदरर्लंडविरुद्ध होईल, तर संघ साखळीमधील चौथा सामना नेपालविरुद्ध 16 जूनला होईल. 


टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ-


नजमुल हुसेन शांतो  (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तनजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदयॉय, महमुदुल्लाह रियाद, झाकेर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान. तंजीम हसन साकिब.


राखीव खेळाडू- अफिफ हुसेन, हसन महमूद.






संबंधित बातम्या:


रोहित शर्मा अन् अजित आगरकर यांना हार्दिक पांड्या पसंत नव्हता...; कोणाच्या दडपणामुळे संघात स्थान?, पाहा


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!


वेस्ट इंडीज अन् अमेरिकेत रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार; सामना कधी सुरु होणार, कुठे फ्रीमध्ये पाहता येणार?, जाणून घ्या