Gautam Gambhir All Time World 11 : भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्वकालीन वर्ल्ड इलेव्हन संघाची निवड केली आहे. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी तीन खेळाडूंना स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेतील दोन दिग्गजांची निवड केली, तर श्रीलंका आणि इंग्लंडमधील प्रत्येकी एका खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. गंभीरने ज्या खेळाडूंविरुद्ध खेळला आहे, त्या सर्व खेळाडूंना एकत्र करून हा संघ बनवला आहे. त्यामुळे कोणत्याही भारतीय खेळाडूचे नाव त्यात समाविष्ट नाही. 


श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणारा गौतम गंभीर आता मायदेशात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. भारताला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर दोन्ही संघ 3 टी-20 मालिकेत आमनेसामने येतील. 


श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना विश्रांती मिळाली असून त्यात वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेत आहेत, तर उर्वरित खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये हात आजमावण्याची संधी मिळाली आहे.


गंभीरची वर्ल्ड इलेव्हन


स्पोर्ट्सकीडाच्या म्हणण्यानुसार, गंभीरने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि अष्टपैलू अब्दुल रज्जाकचा सर्वकालीन वर्ल्ड इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ॲडम गिलख्रिस्ट, सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स यांना स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल यांचाही समावेश आहे.


वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ यांचीही गौतम गंभीरने ऑल टाइम वर्ल्ड प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली आहे.


गौतम गंभीरची ऑल टाइम वर्ल्ड-11 :           


ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), अँड्र्यू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया), इंझमाम-उल-हक (पाकिस्तान), अब्दुल रझाक (पाकिस्तान), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), शोएब अख्तर (पाकिस्तान), मोर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका), अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड).



संबंधित बातमी :


IPLच्या स्टारचा झाला मोठा अपघात! मानेला चेंडू लागल्याने गंभीर जखमी; हॉस्पिटलमध्ये दाखल


सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस


ऑलिम्पिकआधी मोडकळीस आलेले घर अन् 80 लाखांची संपत्ती; सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता अर्शद नदीमने नीरज चोप्रालाही टाकलं मागे!