Arshad Nadeem Paris Olympics 2024: पाकिस्तानचा अर्शद नदीम 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून सतत चर्चेत आहे. अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये 92.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. तर भारताचा नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शद नदीमच्या एकूण संपत्तीचीही बरीच चर्चा होत आहे. सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी अर्शदची आर्थिक स्थिती खूपच खराब होती, मात्र आता त्याची संपत्ती नीरज चोप्रापेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 ऑगस्ट 2024 पूर्वी म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी अर्शद नदीमची (Arshad Nadeem) एकूण संपत्ती फक्त 80 लाख रुपये होती. तसेच अर्शद नदीमचे घर देखील मोडकळीस आले होते. एकेकाळी अर्शदकडे नवीन भाला घेण्यासाठीही पैसे नव्हते. पण आता तो श्रीमंत झाला आहे. अर्शद नदीमकडे आता 9 कार आणि 7 अपार्टमेंट असल्याचा दावा एका पाकिस्तानी व्यक्तीने सोशल मीडियावर केला आहे. तसेच अर्शद नदीमकडे आता जवळपास 47 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अर्शद नदीमने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 


नीरज चोप्राची संपत्ती किती?


अर्शद नदीमच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. अर्शद नदीमला पाकिस्तानच्या मुख्यमंत्र्यांपासून ते महापौरांपर्यंत अनेकांनी बक्षीस दिले आहेत. आता अर्शद नदीमची संपत्ती भारताच्या नीरज चोप्रापेक्षा जास्त असल्याचा दावा चाहते सातत्याने करत आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. नीरजकडे अनेक महागड्या कार आणि बाइक्स आहेत.


अर्शद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड अन् सुवर्णपदक-


अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. अर्शद नदीमने 92.97 मीटर फेक केली होती. त्याच्या या थ्रोची ऑलिम्पिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक पटकावले.


अर्शद नदीमचा संघर्षमय प्रवास-


अर्शद नदीमचा पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ऑलिम्पिकपर्यंत पोहचण्यासाठी अर्शद नदीमला कठोर मेहनत करावी लागली. त्याचे वडील मजुरी करतात. नदीमसा प्रशिक्षण देण्यासाठी पैसेही उपलब्ध व्हावेत यासाठी गावातील लोकांनी वर्गणी काढून रक्कम जमा केली. 


संबंधित बातमी:


सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस


सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस