Faruque Ahmed to be the new BCB president : बांगलादेशातील सत्तापालटानंतर महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चे सामने यूएईमध्ये हलवण्यात आले. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता मंडळाला नवा अध्यक्ष मिळाला आहे. ढाका येथे बुधवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत माजी क्रिकेटपटू फारुख अहमद यांची नवीन अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
फारुख अहमद बांगलादेश क्रिकेट बोर्डात पद भूषवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तो दोनदा संघाचा मुख्य निवडकर्ताही होता. प्रथम 2003 ते 2007 आणि नंतर 2013 ते 2016 पर्यंत फारुख अहमद यांनी मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सांभाळली होती.
मुख्य निवडकर्त्याच्या दुस-या कार्यकाळात फारुख अहमद यांनी निवड समितीच्या विस्ताराशी सहमत नसल्यामुळे मध्यंतरी राजीनामा दिला. मुख्य निवडकर्त्याच्या पहिल्या कार्यकाळात शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम आणि तमिम इक्बाल या खेळाडूंनी बांगलादेशकडून पदार्पण केले होते.
बांगलादेशसाठी खेळले सात एकदिवसीय सामने
फारुख अहमद यांनी 1988 ते 1999 दरम्यान 7 एकदिवसीय सामने खेळले. त्याने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एकदिवसीय सामन्याच्या 7 डावात फलंदाजी करताना त्याने 105 धावा केल्या, ज्यात 1 अर्धशतक आहे. याशिवाय, त्याने पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 8 डावात 36.85 च्या सरासरीने 258 धावा केल्या. या काळात त्याने 1 अर्धशतक झळकावले.
बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर
सध्या बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात 21 ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेशसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल कारण आतापर्यंत बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या दोघांमध्ये आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने 12 सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला.
संबंधित बातमी :
IPLच्या स्टारचा झाला मोठा अपघात! मानेला चेंडू लागल्याने गंभीर जखमी; हॉस्पिटलमध्ये दाखल
सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस