Australia Team arrives in India: टीम इंडियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिके खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (India vs Australia) भारतात दाखल झालाय. ऑस्ट्रेलियाचा संघ उद्यापासून सरावाला सुरुवात करणार आहे. भारतीय संघही उद्या मोहाली (Mohali) येथे रवाना होऊन सरावाला सुरुवात करेल. भारताविरुद्ध टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियानं तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला विश्रांती दिलीय. तर, मिचेश मार्श, मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉयनिस दुखापतीमुळं संघाबाहेर झाले आहेत. 


विश्वचषकापूर्वी ही मालिका किती महत्त्वाची?
ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका त्यांच्या तयारीची कसोटी पाहण्याची उत्तम संधी असेल. दोन्ही संघ एकमेकांना जबरदस्त स्पर्धा देतील, अशी अपेक्षा आहे.


'या' खेळाडूंवर राहणार सर्वांची नजर
दुखापतीमुळं आशिया चषकाला मुकलेल्या भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलनं सरावाला सुरुवात केलीय. टी-20 विश्वचषकापूर्वी दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन टी-20 सामने खेळणार आहे. तर, दोन वार्म-अप सामन्यातही दोघं खेळणार आहेत. टी-20 विश्वचषकापूर्वी दोघांचाही फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न असेल. बुमराह आणि हर्षल पटेलशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजर असतील. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोहम्मद शामीची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. त्याचबरोबर दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांना या मालिकेत स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. याशिवाय, दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळवण्यासाठी आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.


भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.


ऑस्ट्रेलिया संघ:
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.


हे देखील वाचा-