Kyle Mayers Six Video: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज (Australia vs West Indies) यांच्यात आज पहिला टी-20 सामना खेळला गेला. कॅरारा ओव्हलच्या (Carrara Oval) क्विन्सलँडच्या (Queensland) क्रिकेट मैदानावर खेळला गेलेल्या हा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. मात्र, त्यांच्या पदरात निराशा पडली. हा सामना ऑस्ट्रेलियानं 3 विकेट्सनं जिंकून दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या विजयापेक्षा वेस्ट इंडीजचा फलंदाज काइल मेयर्सच्या (Kyle Mayers) अतरंगी षटकारची अधिक चर्चा रंगलीय. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
काइल मेयर्सच्या षटकाराची चर्चा
वेस्ट इंडीजच्या डावातील चौथ्या षटकात कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर मेयर्सनं कव्हर्सच्यावरून 105 मीटर उत्तुंग षटकार लगावला. मेयर्सचा हा षटकारपाहून मैदानातील खेळाडू, अंपायरसह स्टँडमध्ये बसलेले प्रक्षकही हैराण झाले.भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही मेयर्सच्या या षटकाराचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. मेयर्सचा हा षटकार खरोखरच अविश्वसनीय आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघानं ऑस्ट्रेलियासमोर 146 धावांचं लक्ष्य ठेवलं. तर, मेयर्सनं आपल्या संघासाठी सर्वाधिक 39 धावांचं योगदान दिलं.
व्हिडिओ-
ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडीजच्या तोंडातून विजयी घास हिसकावला
वेस्ट इंडीजच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियानं अवघ्या 58 धावांवर पाच विकेट्स गमावल्या. सामना वेस्ट इंडीजच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना कर्णधार आरोन फिंच आणि मॅथ्यू हेडन मोक्याची क्षणी संघाचा डाव सावरला. फिंचनं 53 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली आणि कारकिर्दीतील 18 वं अर्धशतक झळकावलं. तर, वेडनं 29 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. शेल्डन कोट्रेलच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लागला. पुढच्या चेंडूवर हेडचा झेल सुटला. त्यानंतर मिचेल स्टार्कचाही झेल सुटला. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या संघानं या सामन्यात तीन विकेट्सनं विजय मिळवला, असं बोलणं वावग ठरणार नाही.
हे देखील वाचा-