ICC T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. आयसीसीच्या या महत्वाच्या स्पर्धेसाठी प्रत्येक देशानं आपपल्या संघात उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश केलाय. तसेच बोर्ड आपल्या खेळाडूंच्या फिटनेसचीही काळजी घेतानं दिसत आहेत. याचदरम्यान,वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज शिमरॉन (Shimron Hetmyer) हेटमायरला वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं टी-20 विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. शिमरॉन हेटमायरनं ऑस्ट्रेलियासाठी जाणारे विमान चुकवलं आहे. संघाचं नियोजित विमान शनिवारी (1 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार होतं. परंतु, शिमरॉनच्या कौटुंबिक कारणांमुळं हे विमान सोमवारी उड्डाण भरणार असल्याचं बोर्डानंकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र, तरीही तो संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकला नाही. याच कारणास्तव वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं त्याला विश्वचषक संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाचं म्हणजे,वेस्ट इंडीजनं त्याच्या पर्यायी खेळाडूचीही घोषणा केलीय. 


मिळालेल्या माहितीनुसार, आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ शनिवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होता. परंतु, शिमरॉन हिटमायरच्या कौटुंबिक कारणांमुळं नियोजनात बदल करण्यात आला. संघाचे नियोजन ऑस्ट्रेलिसाठी शनिवारी रवाना होणार होतं. पण त्यानं विनंती केल्यानंतर वेस्ट इंडीजच्या संगाचा प्रवास सोमवारपर्यंत पुढं ढकलला गेला. मात्र, तरीही शिमरॉन हेटमायरनं ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणारे विमान चुकवलं. त्यानंतर सीडब्ल्यूआयच्या निवड समितीनं त्याला टी-20 विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्याऐवजी शमरह ब्रुक्ससाला संघात शामील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आलीय. 


कधी, कुठे रंगणार स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 


टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ:
निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शमरह ब्रूक्स, जेसन होल्डर, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेड मॅकॉय, रेयॉन रेफर, ओडियन स्मिथ.


हे देखील  वाचा-