Ajinkya Rahane, wife Radhika become parents to baby boy: भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकानं आज सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. स्वत: अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, अजिंक्य रहाणेची मुलगी आर्याचाही जन्म आजच्याच दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबर 2019 मध्ये झाला होता. त्यानंतर आज तीन वर्षांनंतर अजिंक्य रहाणेच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हललाय. 


अजिंक्य राहणेची इंस्टाग्राम पोस्ट-









 


अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
कसोटी स्पेशलिस्ट अजिंक्य रहाणेनं बुधवारी संध्याकाळी ट्विटरच्या माध्यमातून तो दुसऱ्यांदा पिता झाल्याची माहिती दिली. "आज सकाळी राधिका आणि मी आमच्या बाळाचं जगात स्वागत केलं. राधिका आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. तुमच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आशिर्वादासाठी सर्वांचं धन्यवाद!"


एकाच दिवशी दोन्ही मुलांचा जन्म
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांनी 26 सप्टेंबर 2014 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांनी मराठी रितीरिवाजानुसार लग्न केलं. दोघेही बालपणीचे मित्र आहेत. लग्नाच्या पाच वर्षांनंतर 2019 मध्ये राधिकानं मुलगी अर्याला जन्म दिला. आर्याचाही जन्म 5 ऑक्टोबरला झाला होता आणि आता त्यांच्या मुलाचाही जन्म 5 ऑक्टोबरलाच झालाय.


अजिंक्य राहणेची खराब फॉर्मशी झुंज
अजिंक्य रहाणे गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून मैदानात संघर्ष करताना दिसत आहे. ज्यामुळं त्याला भारतीय कसोटी संघातील स्थान गमवावं लागलं होतं. सध्या तो त्याच्या कारकिर्दीतील खराब फॉर्मशी झुंज देतोय.अजिंक्य रहाणेनं भारतीय कसोटी संघाचं उपकर्णधारपदही संभाळलंय.त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं अनेक सामने जिंकले आहेत.


हे देखील वाचा-