T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 2-1 अशी बाजी मारली. या विजयासह भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं सलग दहाव्या मालिकेत विजय नोंदवला आहे. ज्यात चार क्लीन स्वीपचा समावेश आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची पहिली टी-20 मालिका खेळली होती.तेव्हापासून तर आतापर्यंत भारतानं एकही मालिका गमावली नाही, ज्यात रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता.


रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं न्यूझीलंड (टी-20), वेस्ट इंडीज (एकदिवसीय), वेस्ट इंडीज (टी-20), श्रीलंका (टी-20), श्रीलंका (कसोटी), इंग्लंड (टी-20), इग्लंड (एकदिवसीय), वेस्ट इंडीज (टी-20), ऑस्ट्रेलिया (टी-20) आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा (टी-20) पराभव केला. यादरम्यान, भारतानं सलग न्यूझीलंड, वेस्ट इंडीज (एकदिवसीय आणि टी-20) आणि श्रीलंकेच्या संघाला क्लीन स्वीप दिलं. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध 2-0 अशी कसोटी मालिका, इंग्लंडविरुद्ध 2-1 अशी टी-20 मालिका, इग्लंडविरुद्ध 2-1 अशी एकदिवसीय मालिका, वेस्ट इंडीजविरुद्ध 4-1 अशी टी-20 मालिका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 अशी टी-20 मालिका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला.


रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं जिंकलेल्या सलग दहा मालिकेची यादी            


1) भारताचा न्यूझीलंडवर 3-0 नं विजय (टी-20 मालिका)
2) भारताचा वेस्ट इंडीजवर 3-0 नं विजय (एकदिवसीय मालिका)
3) भारताचा वेस्ट इंडीजवर 3-0 नं विजय (टी-20 मालिका)
4) भारताचा वेस्ट श्रीलंकेवर 2-0 नं विजय (टी-20 मालिका)
5) भारताचा श्रीलंकेवर 2-0 नं विजय (कसोटी मालिका)
6) भारताचा इंग्लंडवर 2-1 नं विजय (टी-20 मालिका)
7) भारताचा इंग्लंडवर 2-1 नं विजय (एकदिवसीय मालिका)
8) भारताचा वेस्ट इंडीजवर 4-1 नं विजय (टी-20 मालिका)
9) भारताचा ऑस्ट्रेलियावर 2-1 नं विजय (टी-20 मालिका)
10) भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 2-1 नं विजय (टी-20 मालिका)


टी-20 विश्वचषकात चांगल्या कामगिरीची अपेक्षा
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं एकही टी-20 मालिका गमावली नाही. यामुळं आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी बजावेल, अशी अपेक्षा आहे. 


हे देखील वाचा-