AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या 189 धावांवर रोखलं. यानंतर ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) कसोटी कारकिर्दीतील 100व्या सामन्यात शतक झळकावून खास क्लबमध्ये एन्ट्री केलीय. अशी कामगिरी करणारा तो जगातील 11वा खेळाडू ठरलाय. तसेच त्यानं कसोटी क्रिकेटमधील 8 हजार धावांचा टप्पाही गाठलाय.


डेव्हिड वॉर्नरनं मेलबर्न कसोटीत अप्रतिम खेळी करत आपल्या कारकिर्दीतील 100व्या कसोटीत शतक झळकावलं. अशी कामगिरी करणारा तो जगातील 11वा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हा पराक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रिकी पाँटिंगनं केला होता.


ट्वीट-




 


डेव्हिड वॉर्नरच्या 8 हजार कसोटी धावा
डेव्हिड वॉर्नरनं आपल्या 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्यासोबतच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 8000 धा्वाही पूर्ण केल्या आहेत. त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीत 25 शतकं झळकावली आहेत. वॉर्नरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वात खतरनाक खेळाडू मानलं जातं. त्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक खास विक्रमाला गवसणी घातलीय. 


100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारे फलंदाज


1)  1968: कॉलिन काउड्री (इंग्लंड) 


2) 1989:  जावेद मियाँदाद (पाकिस्तान)


3) 1990:  गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज) 


4) 2000: अॅलेक स्टुअर्ट (इंग्लंड) 


5) 2005:  इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) 


6) 2006: रिकी पाँटिंग- 2 शतकं (ऑस्ट्रेलिया) 


7) 2012:  ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) 


8) 2017: हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) 


9) 2021: जो रूट (इंग्लंड) 


10) 2022: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)


हे देखील वाचा-