Team India news T20 Captain : बीसीसीआय (BCCI) लवकरच स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) नवीन वर्षाची भेट देऊ शकतो. स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइडस्पोर्ट्सच्या माहितीनुसार, बीसीसीआय 3 जानेवारी (मंगळवारी) अधिकृतपणे हार्दिक पांड्याला भारताचा नवा T20 कर्णधार म्हणून घोषित करु शकते. भारत 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेला सुरुवात करणार आहे. त्याच वेळी ही घोषणा केली जाऊ शकते. 3 जानेवारी रोजीच चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समिती श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करेल. हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या जागी टी-20 मालिकेत खेळणार हे जवळपास निश्चित आहे. रोहित दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दरम्यान 2024 टी-20 विश्वचषकापर्यंत पांड्याला भारताचा कर्णधार म्हणून घोषित केले जाईल.
इनसाइडस्पोर्ट्सने बीसीसीआयच्या एका महत्त्वाच्या सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, "हार्दिक पांड्याला भारताचा नवा T20 कर्णधार म्हणून उदयास येण्याची वेळ आली आहे. रोहित शर्मा आणि सध्याच्या संघातील अनेकजण 2024 पर्यंत निवृत्त होण्याची शक्यता आहे." तसंच ''रोहित शर्मा अजूनही 100 टक्के फिट नाही. आम्ही असा कोणताही धोका पत्करणार नाही. जाडेजा आणि बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परतले आहेत. त्याची रिकव्हरी चांगली आहे. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यास त्यांची निवड होऊ शकतो. सध्या आम्ही टी20 नाही तर वनडे मालिकेवर अधिक लक्ष देत आहोत.'' असंही या सूत्राकडून सांगण्यात आलं.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला एकदिवसीय सामना | 3 जानेवारी | वानखेडे स्टेडियम, मुंबई | सायंकाळी 7 वाजता |
दुसरा एकदिवसीय सामना | 5 जानेवारी | एमसीए स्टेडियम, पुणे | सायंकाळी 7 वाजता |
तिसरा एकदिवसीय सामना | 7 जानेवारी | सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट | सायंकाळी 7 वाजता |
टी20 मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला टी20 सामना | 10 जानेवारी | बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी | दुपारी 2 वाजता |
दुसरा टी20 सामना | 12 जानेवारी | ईडन गार्डन्स, कोलकाता | दुपारी 2 वाजता |
तिसरा टी20 सामना | 15 जानेवारी |
ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम |
दुपारी 2 वाजता |
हे देखील वाचा-