Nortje in AUS vs SA 2nd Test : ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये सर्वात वर डेव्हिड वॉर्नरचं (David Warner) द्विशतक आहे. त्याने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा वॉर्नर पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. पण याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया (Anrich Nortje) हा देखील उत्कृष्ट लयीत दिसला. त्याने आपल्या शानदार अशा वेगवान चेंडूने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला अक्षरश: जखमी केलं. त्याचवेळी त्याने या सामन्यात यंदाच्या वर्षातील सर्वात वेगवान चेंडूही टाकला. त्याच्या या चेंडूचा सामना डेव्हिड वॉर्नरने केला.


नॉर्खियाच्या या वेगवान चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, नॉर्खिया राऊंड द विकेटवरून येतो आणि वॉर्नरच्या दिशेने चेंडू टाकतो, वॉर्नर कसाबसा या चेंडूचा सामना करतो. नोर्खियाने डावाच्या 43व्या षटकात हा वेगवान चेंडू टाकला. त्याच्या या चेंडूचा वेग 155kmph इतका असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे या षटकात त्याने पहिले पाचही चेंडू 150 किमीहून अधिक वेगाचे टाकले. यामध्ये त्याने पहिला चेंडू 151kmph, दुसरा चेंडू 150kmph, तिसरा चेंडू 152kmph, चौथा चेंडू 155 kmphआणि पाचवा चेंडू पुन्हा 155kmph वेगाने फेकला. नॉर्खियाने आतापर्यंत एकही विकेट घेतली नसली तरी त्याचा वेग जबरदस्त आहे. 


पाहा VIDEO -






आतापर्यंतच्या सामन्याची स्थिती


या सामन्याला दोन दिवस पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 3 विकेट गमावून 386 धावा केल्या आहेत. या धावांमुळे ऑस्ट्रेलियाने 197 धावांची आघाडी मिळवली आहे. पहिल्या डावात आफ्रिकेचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. नॉर्खिया आणि मार्को जॅनसेन व्यतिरिक्त इतर गोलंदाजांची इकोनॉमी 4 हून अधिक असल्याचं दिसून आलं आहे.


हे देखील वाचा-