Rohit Sharma in IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेश दौऱ्यानंतर श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) टी20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान बांगलादेश दौऱ्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाला होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत तो संघात नव्हता. पण आता तो संघात परतण्याची शक्यत निर्माण झाली आहे. कारण रोहितने स्वत: त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन सराव करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना 'पोहोचतोय तिथे (Getting there)' असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे तो आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिपोर्ट्समधून समोर येणाऱ्या माहितीनुसार, रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत दिसणार नाही. तो आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने टी20 नंतर श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत संघात परतू शकतो. पण आता त्याने पोस्ट केलेल्या फोटोंतील त्याचा सराव पाहून तो टी-20 आणि एकदिवसीय दोन्ही मालिका खेळताना दिसू शकतो. दरम्यान आता टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतरच रोहित शर्मा टी-20 मालिकेत पुनरागमन करणार की नाही हे स्पष्ट होईल.
रोहितची इन्स्टाग्राम पोस्ट-
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला एकदिवसीय सामना | 3 जानेवारी | वानखेडे स्टेडियम, मुंबई | सायंकाळी 7 वाजता |
दुसरा एकदिवसीय सामना | 5 जानेवारी | एमसीए स्टेडियम, पुणे | सायंकाळी 7 वाजता |
तिसरा एकदिवसीय सामना | 7 जानेवारी | सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट | सायंकाळी 7 वाजता |
टी20 मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला टी20 सामना | 10 जानेवारी | बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी | दुपारी 2 वाजता |
दुसरा टी20 सामना | 12 जानेवारी | ईडन गार्डन्स, कोलकाता | दुपारी 2 वाजता |
तिसरा टी20 सामना | 15 जानेवारी |
ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम |
दुपारी 2 वाजता |
हे देखील वाचा-