Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ आज (मंगळवार) जाहीर केला जाऊ शकतो. मागील काही काळापासून सातत्याने टी-20 संघात निवड झालेल्या राहुल त्रिपाठीला यावेळीही संधी मिळण्याची शक्यता आहे, पण अंतिम 11 मध्ये संधी मिळणार का? हा प्रश्न अजूनही कायम आहे.

आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर राहुल त्रिपाठीला अनेक टी20 मालिकांसाठी भारतीय संघात संधी मिळाली होती, पण त्याला पदार्पणाची संधी मात्र मिळू शकली नाही. प्रत्येक वेळी राहुल बेंचवर बसलेला दिसत होता. पण यावेळी त्याचे पदार्पण अपेक्षित आहे कारण केएल राहुल त्याच्या लग्नाच्या तयारीमुळे संघाबाहेर असेल, तर रोहित शर्मा देखील अनफिट आहे. दुसरीकडे, विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ऋषभ पंत आणि दीपक हुडा यांसारखे वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे, यावेळी राहुल त्रिपाठीला संघासह प्लेईंग-11 मध्ये स्थान मिळू शकते.

राहुल त्रिपाठीची कारकीर्द

31 वर्षीय राहुल त्रिपाठी गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये धावा करत आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. जर आपण आयपीएल आणि देशांतर्गत टी20 सामन्यांच्या एकूण रेकॉर्डवर नजर टाकली तर राहुल त्रिपाठीने 125 टी-20 सामन्यांमध्ये 26.93 च्या सरासरीने आणि 134.14 च्या स्ट्राइक रेटने 2800 हून अधिक धावा केल्या आहेत. या खेळाडूकडे लिस्ट-ए (53 सामने) आणि प्रथम श्रेणी (51) सामन्यांचाही चांगला अनुभव आहे. 

श्रीलंकेविरुद्ध संभाव्य टी-20 संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, ईशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, अरमन आणि उमरन मलिक.

श्रीलंकेविरुद्ध संभाव्य अंतिम 11

शुभमन गिल, ईशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

भारत विरुद्ध श्रीलंका टी20 सामन्यांचं वेळापत्रक

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला टी20 सामना 10 जानेवारी  बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी  दुपारी 2 वाजता
दुसरा टी20 सामना 12 जानेवारी  ईडन गार्डन्स, कोलकाता दुपारी 2 वाजता
तिसरा टी20 सामना 15 जानेवारी 

ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम

दुपारी 2 वाजता

हे देखील वाचा-