Asia Cup Winner List : यंदाचा आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मोठ्या वादानंतर आशिया चषक हायब्रिड स्वरुपात होणार आहे. चार सामने पाकिस्तानात तर 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहे. यंदाचा आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीम होय, त्यामुळे प्रत्येक सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. आजच्या लेखात आपण आशिया चषकाचा इतिहास पाहणार आहोत.. कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा आशिया चषक जिंकला... आशिया चषकाची सुरुवात कधी झाली.. हे पाहूयात

आशिया चषकाचा यंदाचा 16 वा हंगाम आहे. आतापर्यंत 13 वेळा एकदिवसीय स्वरुपात आशिया चषक झालाय तर दोन वेळा टी20 फॉर्मेटमध्ये आशिया चषक झालाय. भारतीय संघ आशिया चषकात सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत सर्वाधिकवेळा आशिया चषकावर नाव कोरलेय. पाकिस्तानला संघाला फक्त दोन वेळा जेतेपद मिळालेय. बांगलादेश हा एकमेव असा संघ आहे, जो फायनलमध्ये जाऊनही जेतेपद मिळवू शकला नाही.  भारतीय संघाने आतापर्यंत सातवेळा आशिया चषकावर नाव कोरलेय. पाकिस्तानने दोन आणि श्रीलंकाने सहा वेळा आशिया चषक जिंकलाय. आशिया चषकाची सुरुवात 1984 मध्ये झाली होती. भारतीय संघाने पहिल्या आशिया चषकावर नाव कोरले होते. 

1984 पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 15 वेळा आशिया चषक स्पर्धा पार पडलीय. भारतीय संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं सहा वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना दोन वेळा आशिया चषक जिंकता आला आहे.  1984, 1988, 1990, 1995 भारताने आशिया चषकावर नाव कोरलेय. 1997 मध्ये श्रीलंकेनं आशिया चषकावर नाव कोरले होते. पाकिस्तानने 2000 मध्ये पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. 

 आशिया चषक विजेत्या संघाची यादी:

क्रमांकवर्षविजयी संघ
11983/84भारत
21985/86श्रीलंका
31988/89भारत
41990/91 भारत
51994/95 भारत
61997श्रीलंका
72000 पाकिस्तान
82004 श्रीलंका
92008श्रीलंका
102010 भारत
112011/12पाकिस्तान
122013/14 श्रीलंका
132016 भारत (टी-20)
142018भारत
152022श्रीलंका

यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह नेपाळ हा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. आशिया चषकात एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये 6 सुपर 4 सामने होणार आहेत. 

आशिया चषकाचे संपूर्ण वेळापत्रक

तारीखफेरीसामनाठिकाण
30 ऑगस्ट 20231पाकिस्तान vs नेपाळमुल्तान, पाकिस्तान
31 ऑगस्ट 20231बांगलादेश vs श्रीलंकाकँडी, श्रीलंका
2 सप्टेंबर 20231पाकिस्तान vs भारतकँडी, श्रीलंका
3 सप्टेंबर 20231बांगलादेश vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान
4 सप्टेंबर 20231भारत vs नेपाळ कँडी, श्रीलंका
5 सप्टेंबर 20231श्रीलंका vs अफगाणिस्तानलाहोर, पाकिस्तान
6 सप्टेंबर 20232 (सुपर - 4)A1 vs B2लाहोर, पाकिस्तान
9 सप्टेंबर 20232 (सुपर - 4)B1 vs B2कँडी, श्रीलंका
10 सप्टेंबर 20232 (सुपर - 4)A1 vs A2कँडी, श्रीलंका
12 सप्टेंबर 20232 (सुपर - 4)A2 vs B2दांबुला, श्रीलंका
14 सप्टेंबर 20232 (सुपर - 4)A1 vs B1 दांबुला, श्रीलंका
15 सप्टेंबर 20232 (सुपर - 4)A2 vs B2दांबुला, श्रीलंका
17 सप्टेंबर 2023 फायनलS4 1 vs S4 2कोलंबो, श्रीलंका