India vs West Indies 4th T20 Match Prediction: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने कमबॅक केले. आज चौथा टी20 सामना फ्लोरिडा येथे रंगणार आहे. हा सामना जिंकून विडिंज मालिका खिशात घालणार की भारत जिंकून बरोबरी  साधणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 


पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप गेलेल्या सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यात विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मा याने सूर्यकुमार याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने तिन्ही सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सलामी फलंदाज शुभमन गिल तिन्ही सामन्यात फेल गेला. पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कर्णधार हार्दिक पांड्यालाही अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीत कुलदीप आणि चहल यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. हार्दिकनेही अचूक टप्प्यावर मारा केलाय. आज होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय ? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 


फ्लोरिडा येथे आज भारताला आज पराभवाचा सामना करावा लागल्यास मालिका गमावावी लागेल. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो असा आहे. हार्दिक पांड्या अॅण्ड कंपनी विजयासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघाच्या नजरा मालिका विजयाकडे असतील. त्यामुळे आज होणारा सामना रंगतदार होईल.  मागील सात वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरोधात टी20 मालिका जिंकता आली नाही. कॅरेबिअन आर्मीने 2016 मध्ये अखेरची टी20 मालिका जिंकली होती. 


हेड टू हेड - 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 18 सामने जिंकलेत तर विडिंजला नऊ सामन्यात विजय मिळालाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही. 


कोण वरचढ ?


भारताच्या युवा टीमपुढे तगड्या वेस्ट इंडिजचे आव्हान आहे. कागदावर विडिंजचा संघ वरचढ दिसतोय. आतापर्यंत झालेले तिन्ही सामन्याची खेळपट्टी संथ होती, पण आता चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होत आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, त्यामुले चौथा सामना हायस्कोरिंग असेल. आजच्या सामन्यात विडिंजचे पारडे जड दिसतेय. 


भारताची संभाव्य प्लेईंग 11 - 
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक. 


वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेईंग 11 - 


ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिमरन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्ज़ारी जोसेफ आणि ओबेद मैककॉय.