एक्स्प्लोर

Team India playing 11: आशिया कपआधी चिंतेत टीम, संजू सॅमसनची नवी भूमिका ठरणार डोकेदुखी; पहिल्याच डावात अपयशी

Asia Cup 2025 Team India playing 11 : संजू सॅमसन मागील काही काळापासून अभिषेक शर्मा सोबत टी20 क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळत होता.

Sanju Samson Asia Cup 2025 : संजू सॅमसन मागील काही काळापासून अभिषेक शर्मा सोबत टी20 क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळत होता. त्यामुळे आशिया कपमध्येही तो ह्याच स्थानावर खेळणार अशी चर्चा होती. गेल्या 10 टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये संजूनं तब्बल 3 शतकं झळकावली. मात्र इतर डावांत त्याचा खेळ विशेष चमकला नाही. तरीदेखील आशिया कपसाठी या स्थानाचा मोठा दावेदार तो मानला जात होता. पण संघ व्यवस्थापनाची भूमिका वेगळी निघाली. आता शुभमन गिल सलामीला उतरणार आहे. संजूनं मात्र नव्या स्थानासाठी तयारीला सुरुवात केली आहे, पण पहिल्याच प्रयत्नात त्याला अपयश आलं.

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघ घोषणेच्या वेळी स्पष्ट केले होते की, शुभमन गिल संघात नसल्याने संजू सॅमसन ओपनिंग करत होता, आता तो परतला आहे. याचा अर्थ असा की गिल आणि अभिषेक शर्मा आशिया कपमध्ये ओपनिंग (Asia Cup 2025 Team India playing 11) करतील अशी शक्यता आहे. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर येतील. हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, त्यामुळे सहाव्या क्रमांकाचा क्रमांक विकेटकीपर फलंदाज सॅमसनसाठी रिक्त राहील.

संजू सॅमसन करतोय सहाव्या क्रमांकाची तयारी

टीम इंडियाचा स्टार फलंदाज संजू सॅमसन आता सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी तयारी करत आहे. केरळ प्रीमियर लीगच्या पाचव्या सामन्यात त्याने या स्थानावर फलंदाजीची टेस्ट घेतली. कोची ब्लू टायगर्स संघाकडून खेळताना संजूसाठी हा पहिला प्रयत्न मात्र यशस्वी ठरला. शनिवारी झालेल्या या सामन्यात त्याने 22 चेंडूत केवळ 13 धावा केल्या. यामध्ये एकही चौकार किंवा षटकार नव्हता. आशिया कपसाठी तयारी करत असलेल्या संजूसाठी हे प्रदर्शन निश्चितच निराशाजनक म्हणावे लागेल.

केरळ प्रीमियर लीगमधील कोची ब्लू टायगर्सच्या पहिल्या सामन्यात संजूला फलंदाजीची संधीच मिळाली नव्हती. मात्र दुसऱ्या सामन्यात तो खेळायला आला तेव्हा त्याच्या बॅटमधून फक्त 13 धावाच निघाल्या. तरीदेखील कोची ब्लू टायगर्सने हे दोन्ही सामने जिंकले आहेत.

गेल्या 10 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये संजूने 3 शतके झळकावली आहेत, त्यापैकी 2 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि एक बांगलादेशविरुद्ध आहे. परंतु इतर 7 डावांमध्ये तो 5 वेळा दुहेरी आकडी गाठण्यात अपयशी ठरला, ज्यामध्ये तो दोनदा शून्यावर आऊट झाला.

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ - (Team India Squad For Asia Cup 2025)

फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.

हे ही वाचा -

Afghanistan Squad For Asia Cup 2025 : विराट कोहलीशी भिडणाऱ्या खेळाडूची संघात एन्ट्री, आशिया कपसाठी आणखी एका संघाची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण टीम

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget