Virat Kohli's Record : मुल्तानमध्ये आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात सलामीचा सामना होत आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरोधात श्रीलंकामध्ये होणार आहे. आशिया चषकात विराट कोहलीची नजर सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डवर असेल. 102 धावा करताच विराट कोहली सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडणार आहे. विराट कोहली आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात सचिनचा विक्रम मोडणार का ? याकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 102 धावांची गरज आहे. सचिन तेंडुलकर याने 321 वनडे डावात 13 हजार धावांचा पल्ला पार केला. सचिन तेंडुलकरचा 13 हजार धावांचा पल्ला पार करण्यासाठी 321 डाव लागले होते, विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी 22 डाव असतील. विराट कोहलीने 265 डावांमध्ये 12898 धावा चोपल्या आहेत. विराट कोहली आशिया चषकात वेगवान 13 हजार धावांचा पल्ला पार करण्याची संधी आहे. 102 धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम विराट कोहली मोडणार आहे. 


वनडेमध्ये वेगाने 13 हजार धावा करणारे फलंदाज - 


सचिन तेंडुलकर - 321 डाव 
रिकी पाँटिंग- 341 डाव
कुमार संगकारा- 363 डाव
सनथ जयसूर्या- 416 डाव
विराट कोहली 265 डावात 12898 धावा


पाकिस्तानविरोधातच विराट विक्रम करणार ?


आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात होणार आहे. शनिवारी, 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. याच सामन्यात विराट कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीची बॅट नेहमीच तळपते. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने शतकी खेळी केल्यास सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत होईल. विराट कोहली सर्वात वेगवान 13 हजार धावांचा पल्ला पार करणारा फलंदाज होईल. विराट कोहलीच्या नावावर सध्या सर्वात वेगवान 8000, 9000, 10,000, 11,000 आणि 12,000 धावा करण्याचा विक्रम आहे.


विराट कोहलीचे करिअर कसे राहिलेय ?


माजी कर्णधार विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहलीने आतापर्यंत 274 वनडे सामन्यात 57.32 च्या सरासरीने 12898 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 46 शतके आणि 65 अर्धशतकांचा समावेश आहे. 111 कसोटी सामन्यात विराट कोहलीने 29 शतकांच्या मदतीने 8676 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 29 अर्धशतकेही ठोकली आहेत. टी 20 मध्ये विराट कोहलीची बॅट तळपली आहे. 115 टी 20 सामन्यात विराट कोहलीने 4008 धावा चोपल्या आहेत, यामध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली एकदिवसीय सामन्यात 40 वेळा नाबाद राहिलाय.  


 विराट-रोहित आणखी एक विक्रम करणार ?
Virat Kohli - Rohit Sharma as a pair in ODI: रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. या जोडीला आणखी एक विक्रम करण्याची संधी असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी केल्यास पाच हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने 85 डावात आतापर्यंत 4998 धावा केल्या आहेत. 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी या जोडीच्या नावावर आहेत.