(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup 2023 : आशिया चषकातील सामन्याची वेळ ठरली, वाचा कधी होणार सामने?
Asia Cup 2023 All Match Timing: आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत.
Asia Cup 2023 All Match Timing: आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आशिया चषकाचे वेळापत्रक जारी केले होते. यंदाचा आशिया चषक एकदिवसीय स्वरुपात खेळवला जाणार आहे. आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय. आता सर्व सामन्यांच्या वेळाही समोर आल्या आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून खेळवले जातील.
आशिया चषकात भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर 2023 रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. हा सामना श्रीलंकामधील कँडी येथील मैदानात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ वगळता इतर सर्व संघ पाकिस्तानमध्ये किमान एक सामना तरी खेळणार आहे. 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.
तारीख | फेरी | सामना | ठिकाण | कधी होणार सामना |
30 ऑगस्ट 2023 | 1 | पाकिस्तान vs नेपाळ | मुल्तान, पाकिस्तान | दुपारी 3 वाजता |
31 ऑगस्ट 2023 | 1 | बांगलादेश vs श्रीलंका | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
2 सप्टेंबर 2023 | 1 | पाकिस्तान vs भारत | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
3 सप्टेंबर 2023 | 1 | बांगलादेश vs अफगाणिस्तान | लाहोर, पाकिस्तान | दुपारी 3 वाजता |
4 सप्टेंबर 2023 | 1 | भारत vs नेपाळ | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
5 सप्टेंबर 2023 | 1 | श्रीलंका vs अफगाणिस्तान | लाहोर, पाकिस्तान | दुपारी 3 वाजता |
6 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A1 vs B2 | लाहोर, पाकिस्तान | दुपारी 3 वाजता |
9 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | B1 vs B2 | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
10 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A1 vs A2 | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
12 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A2 vs B2 | दांबुला, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
14 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A1 vs B1 | दांबुला, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
15 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A2 vs B2 | दांबुला, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
17 सप्टेंबर 2023 | फायनल | S4 1 vs S4 2 | कोलंबो, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
कुठे पाहाता येणार सामने?
31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे.