T20 World Cup 2024 : दोन जूनपासून टी 20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात 20 संघाचा सहभाग असेल. स्कॉटलँड आणि आयर्लंडचे संघही आपलं नशीब अजमावणार आहेत. पण महत्वाचं म्हणजे, कर्नाटकमधील सहकारी दुध संघ असलेले नंदिनी डेअरी ब्रँड विश्वचषकात दिसणार आहे. आयर्लंड आणि स्कॉटलँड संघाचं स्पन्सर ही कंपनी झाली आहे. विश्वचषकात या संघाच्या टी शर्टवर नंदनी ब्रँड दिसणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.  त्यासोबत सिद्धरामय्या यांनी स्कॉटलंड पुरुष संघाचा कर्णधार रिची बेरिंग्टनचा नंदिनी ब्रँड लोगो असलेली जर्सी घातलेला फोटो पोस्ट केला आहे.


स्कॉटलंड क्रिकेट संघाने 1 जूनपासून अमेरिकेत सुरू होणाऱ्या ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत प्रायोजक म्हणून कर्नाटकस्थित नंदिनी डेअरी ब्रँडची घोषणा झाली आहे. सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी  आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,  मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, अमेरिका, दुबई, यूएई इत्यादी देशांमध्ये ओळखली जाणारी कर्नाटकची शान असलेली नंदिनी आता स्कॉटलँड आणि आयर्लंडच्या संघांना प्रायोजित करत आहे. राज्यातील सर्वोत्कृष्ट दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ आणि देशातील शेतकऱ्यांची मेहनत या दोन्ही गोष्टी जगासमोर आणण्याचा आमचा निर्धार आहे. नंदिनीला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.






Karnataka Milk Federation ही देशातील दुसरी सर्वात मोठी डेअरी सहकारी संस्था आहे. KMF च्या मते, दक्षिण भारतात, ते खरेदी आणि विक्रीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहेत. Karnataka Milk Federation च्या कर्नाटक राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 16 दूध संघ आहेत. हे प्राथमिक दुग्ध सहकारी संस्था (DCS) कडून दूध संकलित करते आणि कर्नाटकातील विविध शहरे, ग्रामीण बाजारपेठेत ग्राहकांना दूध वितरीत करते.


मोफत पाहा विश्वचषकाचा थरार... 


टी20 विश्वचषकाच्या आधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे.  2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते.