पूर्वी क्रिकेटपटूंची कमाई खूप कमी असायची, पण आता जवळपास प्रत्येक क्रिकेटपटू करोडो रुपये कमावतो. आता भारतीय क्रिकेटपटू अनेक परदेशी क्रिकेटपटूंपेक्षा जास्त कमावतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंना मोठी रक्कम देते. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहेत असे तुम्हाला वाटत असेल. मात्र एक असा क्रिकेटपटू आहे की, जो विराट कोहली आणि एमएस धोनीपेक्षा अधिक श्रीमंत आहे.


कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला (Aryaman Birla) एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. आर्यमन बिर्ला हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तर आहेच, पण त्याला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू म्हटले तर वावगे ठरणार नाही. कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा एवढ्या मोठ्या व्यावसायिक घराण्यातील असूनही त्याला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. 


2019 नंतर क्रिकेटमधून अचानक ब्रेक-


आपल्या मेहनतीने आर्यमन बिर्लाने क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले. तो मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. मात्र, 2019 नंतर त्याने क्रिकेटमधून अचानक ब्रेक घेतला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनगारमन केले नाही. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी आर्यमन बिर्लाने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. मानसिक आरोग्याचे कारण देत आर्यमनने क्रिकेट सोडल्याचे बोलले जात आहे.


आर्यमन बिर्लाची संपत्ती किती?


मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा जवळपास 70,000 कोटी रुपयांचा मालक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तो भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे.


आर्यमन बिर्लाची कारकीर्द कशी होती?


आर्यमन बिर्ला यांनी 2017 मध्ये मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले हे उल्लेखनीय आहे. तो 2019 पर्यंत क्रिकेट खेळला. या काळात आर्यमनने 9 प्रथम श्रेणी आणि 4 लिस्ट-ए सामने खेळले. प्रथम श्रेणी सामन्यांच्या 16 डावांमध्ये, त्याने 27.60 च्या सरासरीने 414 धावा केल्या, ज्यामध्ये 103 सर्वोच्च धावा होत्या. याशिवाय आर्यमनने लिस्ट-ए च्या 3 डावात एकूण 36 धावा केल्या.


छत्तीसगडविरोधात द्विशतकी खेळी-


भलेही आर्यमान श्रीमंत घराण्यातून येत असला तरी आपल्या खेळाच्या बळावर त्याने सर्वप्रथम अंडर-19 टी-20 संघात जागा मिळवली. नंतर अष्टपैलू आर्यमानने सीके नायडू ट्रॉफीमध्ये खो-याने धावा केल्या.  पाच सामन्यांच्या 9 डावांमध्ये तीन शतकांसह 602 धावा बनवल्या. या तीन शतकांमध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. याशिवाय फिरकी गोलंदाजी करताना त्याने 10 विकेट देखील घेतल्या. छत्तीसगडविरोधात 388 चेंडूंचा सामना करत त्याने केलेली द्विशतकी खेळी विशेष चर्चेत होती.  


संबंधित बातमी:


'नीरज चोप्रा नव्हे...या क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवायचाय'; मनू भाकरने व्यक्त केली इच्छा, रंगली जोरदार चर्चा!