लंडन : इंग्लंडची विकेटकीपर एमी जोन्स (Amy Jones) आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाज पीपा क्लेरी(Piepa Cleary) यांनी एंगेजमेंट केली आहे. दोघी बऱ्याच काळापासून एकमेकांना पसंत करत होत्या. यानंतर दोघींनी मैत्री केली होती. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. आता पीपा क्लेरी आणि एमी जोन्स यांनी एंगेजमेंट (Amy Jones Piepa Cleary Engaged) केली आहे. क्लेरी आणि जोन्स महिला क्रिकेटर आहेत. पीपा क्लेरी आणि एमी जोन्स यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन माहिती दिली आहे. एंगेजमेंट कार्यक्रमाला फारच थोडे लोक आमंत्रित केलं होतं.
क्लेरी आणि एमी यांची पहिली भेट वुमन्स विग बॅश लीगमध्ये झाली होती. दोघी पर्थ स्कोचर्स या संघाकडून खेळतात. त्यावेळी दोघींमध्ये मैत्री झाली होती. क्लेरी आणि एमी यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी आता एंगेजमेंट केली आहे. एमी आणि क्लेरी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यावर चाहत्यांनी कमेंट करत अभिनंदन केलं आहे.
एमी जोन्सची कारकीर्द
एमी जोन्सनं इंग्लंडच्या कसोटी टीममध्ये 2019 मध्ये पदार्पण केलं होतं. एकदिवसीय आणि कसोटी संघाची ती सदस्य आहे. इंग्लंडकडून तिनं 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये तिनं 116 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून एमी जोन्सनं 91 एकदिवसीय सामने खेळले असून तिनं 1951 धावा केल्या आहेत. एमीनं सर्वाधिक 94 धावांची खेळी कली होती. याशिवाय 107 टी 20 मॅच देखील तिनं खेळल्या आहेत. यामध्ये 1515 धावा केल्या. तर, एमी जोन्सनं 2013 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शट हिनं जेस होलियोकशी मैत्रीनंतर लग्न केलं होतं.ऑस्ट्रेलियाच्या जीसा जोनासेन हिनं साराह वीयर्न तर, इंग्लंडची वेगवान गोलंदाज नतालिया सीवरनं कॅथरीन ब्रंटशी लग्न केलं होतं.
इतर बातम्या :