Wicket Keepers in Asia Cup 2022 : आशिया कप 2022 स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) सर्व संघ सज्ज झाले आहेत. सामन्यांना 27 ऑगस्ट रोजी पासून सुरुवात होणार असून भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी खेळणार आहे. आशिया खंडातील क्रिकेट चाहत्यांसाठी आशिया कप अगदी विश्वचषकाप्रमाणे असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वच संघाचे खेळाडू कसून सराव करत असून यंदाच्या आशिया कपमध्ये संघाना आपआपल्या यष्टीरक्षक फलंदाजांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. अनेक संघाचे विकेटकिपर फलंदाज टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा देखील करु शकतात. तर नेमके हे फलंदाज कोणते पाहूया... 


मोहम्मद रिझवान


पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान आशिया कपपूर्वी कसून सराव करत असून त्याचे काही व्हिडीओही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पोस्ट केले आहेत. तसंच टी20 वर्ल्ड कप 2021 मध्येही रिझवानने भारताविरुद्ध शानदार फलंदाजी करत पाकिस्तानला एकहाती विजय मिळवून दिला. त्यामुळेत आता तो आशिया कप 2022 मध्ये देखील धमाकेदार फलंदाजी करु शकतो. रिझवानने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 56 टी20 सामन्यांत 50 च्या सरासरीने 1 हजार 662 रन केले असून त्याने शतकही यावेळी ठोकलं आहे.


ऋषभ पंत


भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत तर सर्व फॉर्मेट्समध्ये दमदार कामगिरी करत असल्याने आशिया कपमध्येही तो धावांचा पाऊस पाडू शकतो. तो फलंदाजीने भारतीय संघाच्या धावसंख्येत मोठी वाढ करु शकतो. पंत याने आतापर्यंत 54 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 883 रन केले आहेत.  65 रन हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.  


मुश्फिकुर रहीम


बांग्लादेशचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज मुश्फिकुर रहीम देखील आशिया कपमध्ये त्याच्या अनुभवाचा फायदा घेऊन संघासाठी चांगली कामगिरी नक्कीच करु शकतो. तो बांग्लादेशला पहिल्यांदा आशिया कप जिंकून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याने आतापर्यंत 100 टी20 सामने खेळले 1495 धावा त्याने केल्या असून 72 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.


रहमनुल्लाह गुरबाज


अफगाणिस्तान संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज त्याच्या शानदार फलंदाजीसाठी  ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अफगाणिस्तान संघासाठी 27 टी20 सामन्यात 676 रन केले आहेत. 87 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.


भानुका राजपक्षे


श्रीलंका संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणजे भानुका राजपक्षे. त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने श्रीलंका संघासाठी आतापर्यंत एकूण 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 350 धावा केल्या असून यामध्ये 77 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. 


हे देखील वाचा-