Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहे. यावेळी भारतीय संघाचा (Team India) विचार करता सर्वाधिक नजरा या विराट कोहली वर असणार आहेत. याचं कारण मागील बऱ्याच काळापासून तो खास फॉर्ममध्ये नाही, त्यात आता तो विश्रांतीनंतर संघात परतत असून पाकिस्तानविरुद्ध त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. त्यामुळेच सर्वांच्या नजरा त्याच्यावर टिकून आहेत. यामुळे विराटही सामन्यांपूर्वी कसून सराव करताना दिसत आहे. तो भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर धमाकेदार फलंदाजी करत असल्याचं एका व्हिडीओतून समोर आलं आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून कोहली चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 


पाहा व्हिडीओ - 






कोहली काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानात परतणार आहे. कोहलीने भारताकडून पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या असून आता पाकिस्ताविरुद्धच तो मैदानात उतरणार असल्याने त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. विराट गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. पण आता तो पुन्हा फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत. 


विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज


विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


हे देखील वाचा-