All England Badminton Championships 2023 : भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 (All England Badminton Championships 2023) मध्ये सहभागी होणार आहेत. 19 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार असून 19 मार्च रोजी बर्मिंगहॅम येथे याची सांगता होईल. भारताची अव्वल बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू (PV Sindhu) या स्पर्धेत खेळत असेल आणि इतर खेळाडूही असतील. दुखापतींमधून परतताना आणि सुमार फॉर्मशी झुंज देत, सिंधूला ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील विजेतेपदासाठी देशाची प्रतीक्षा संपवण्याठी सर्व प्रयत्न करुन खेळावे लागणार आहे.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या ((All England Badminton Championship) गौरवशाली इतिहासात, (All England Badminton Championship) 2001 मध्ये पुलेला गोपीचंदचा पुरुष एकेरीचा खिताब मिळाला होता. तर 1980 मध्ये प्रकाश पदुकोणने पुरुष एकेरी विजेतेपदावर नाव कोरलं होते. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनंतरही केवळ दोन भारतीयांनी आतापर्यंत हा सर्वोच्च सन्मान मिळवला आहे. मागील आवृत्तीत अंतिम फेरीत पोहोचल्यावर लक्ष्य सेन मुकुट मिळवण्याच्या जवळ आला होता आणि सायना नेहवाल 2015 च्या आवृत्तीत उपविजेती होती.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप भारतात कुठे पहायची?
ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे सामने दुपारी 2.30 वाजता सुरू होतात.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप सामन्यांंचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतातील जिओ सिनेमा Jio Cinema अॅप आणि वेबसाइट तसेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अधिकृत YouTube चॅनेल, BWF TV वर उपलब्ध असेल. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे थेट प्रक्षेपण भारतातील स्पोर्ट्स 18 1 टीव्ही चॅनलवर उपांत्यपूर्व फेरीपासून उपलब्ध होईल.
कोण आहेत भारताचे खेळाडू, कोणाबरोबर करणार दोन हात?
पुरुष एकेरी- मुख्य ड्रॉ: लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय
महिला एकेरी- मुख्य ड्रॉ: सायना नेहवाल, पीव्ही सिंधू
पुरुष दुहेरी- मुख्य ड्रॉ: सात्विकसाईराज रँकीरेड्डी/चिराग शेट्टी (6), एमआर अर्जुन/ध्रुव कपिला
महिला दुहेरी- मुख्य ड्रॉ: गायत्री गोपीचंद/ट्रीसा जॉली, अश्विनी भट के/शिखा गौतम
मिश्र दुहेरी- मुख्य ड्रॉ: ईशान भटनागर/तनिषा क्रास्टो
ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन 2023 तारखा
कसं आहे बॅडमिंटन चॅम्पियनशिपच वेळापत्रक?
पहिली फेरी : मंगळवार 14 मार्च 2023 आणि बुधवार, 15 मार्च 2023
दुसरी फेरी: गुरुवार, 16 मार्च 2023
उपांत्यपूर्व फेरी: शुक्रवार, 17 मार्च 2023
उपांत्य फेरी: शनिवार, 18 मार्च 2023
अंतिम फेरी: रविवार, 19 मार्च 2023
हे देखील वाचा-