(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Alexia Putellas: अलेक्सिया पुटेलासनं इतिहास रचला; सलग दुसऱ्यांदा बेस्ट महिला फुटबॉलपटूचा मान पटकावला
Ballon d'Or 2022: फ्रान्स फुटबॉल मासिककडून 1956 पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
Ballon d'Or 2022: पॅरिसमध्ये रात्री उशिरा पार पडलेल्या समारंभात यंदाचा 'बलॉन डी'ओर पुरस्कार प्रदान करण्यात आला. फ्रान्स फुटबॉल मासिककडून 1956 पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, बार्सिलोना फुटबॉल संघाची कर्णधार अलेक्सिया पुटेलासनं (Alexia Putellas) सलग दुसऱ्यांदा बेस्ट बेस्ट महिला फुटबॉलपटूचा मान पटकावलाय. सलग दोनदा हा सन्मान मिळवणारी ती पहिली महिला फुटबॉलपटू आहे.
ट्विट-
Back-to-back Women's Ballon d'Or, Alexia Putellas !#ballondor pic.twitter.com/UygJYBwyS9
— Ballon d'Or #ballondor (@francefootball) October 17, 2022
अलेक्सिया पुटेलासच्या नेतृत्वात बार्सिलोनाच्या संघाची दमदार कामगिरी
पुटेलासच्या नेतृत्वाखाली बार्सिलोनानं 30 पैकी 30 सामने जिंकून स्पॅनिश लीग जिंकली. यादरम्यान ती टॉप स्कोरर ठरली.तिनं आपल्या संघाला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीतही पोहचवलं. महिला गटात हा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा जिंकणारी ती महिला फुटबॉलपटू ठरलीय. आतापर्यंत कोणत्याही महिला फुटबॉलपटूला हा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा जिंकता आला नाही.
1998 नंतर पहिल्यांदाच फान्सच्या खेळाडूला मान
फुटबॉल जगतातील एक आघाडीचा देश असणाऱ्या फ्रान्सने 2018 चा फिफा विश्वचषकही पटकावला. त्यांच्याकडे कायमच स्टार खेळाडू असूनही बलॉन डी ओर हा मानाचा पुरस्कार गेली कित्येक वर्षे त्यांच्या खेळाडूला मिळाला नव्हता. फ्रान्सचा जादूगार फुटबॉलर जिदान यानं 1998 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता, ज्यानंतर मात्र एकाही फ्रेंच खेळाडूला ही कमाल करता आली नाही. अखेर यंदाचा हा 2022 चा बलॉन डी ओर मिळवत बेन्झिमाने इतिहास रचला आहे.
बलॉन डी'ओर पुरस्कारबाबत महत्वाची माहिती
फ्रान्समधील फुटबॉल मासिकच्या वतीनं 'बलॉन डी' हा पुरस्कार प्रदान केला जातो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1956 साली झाली, जेव्हा हा पुरस्कार स्टॅनले मॅथ्यूज यांना पहिल्यांदा देण्यात आला होता. तेव्हापासून हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच, 2018 पासून महिला फुटबॉलपटूंनाही हा पुरस्कार देण्यात येतो. 'बलॉन डी'ओर पुरस्कार वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला दिला जातो. जगभरातील पत्रकार आणि चाहते या पुरस्कारासाठी त्यांच्या आवडत्या खेळाडूला मतदान करतात. या आधारावर विजेत्याची निवड केली जाते. हा पुरस्कार 1856 पासून दरवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जात आहे.
हे देखील वाचा-