Ajaz Patel's 10 wicket Haul: भारत- न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलनं (Ajaz Patel) मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. एजाजनं एका डावात भारताच्या दहाही फलंदाजाला बाद करून इतिहास रचलाय. एका डावात दहा विकेट्स घेणारा एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरलाय. वानखेडे मैदानावर सध्या एजाजच्या नावाचा जयघोष सुरू आहे. वानखेडे मैदानावर पराक्रम करणाऱ्या एजाज कोण आहे? त्याचं आणि मुंबईतचं नात काय? तसेच त्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात.
एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाज डगमगताना दिसले. मयांक, अक्षर आणि शुभमन वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही. एजाजनं एक-एक भारताचे दहा विकेट्स घेतल तंबूत पाठवलं. या कामगिरीसह एजाज पटेलनं अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 गडींना बाद केलंय. यात त्यानं 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्या आहेत. अनिल कुंबळेनं पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका इनिंगमध्ये 10 गडी बाद केले होते.
न्यूझीलंडच्या कसोटी संघातील फिरकीपटू अजाज पटेलचा जन्म 1988 साली मुंबईत झाला. ज्यानंतर 1996 मध्ये अजाजचं संपूर्ण कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झालं. दरम्यान 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अजाजनं आतापर्यंतच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरी आज मुंबईच्या मैदानावर भारताविरुद्ध केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-