Dhanashree Verma's Bathroom Selfie: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंना काही क्षणांतच लाखो लाईक्स मिळतात. नुकतीच धनश्रीनं इन्स्टाग्रावर बाथरूममधील एक सेल्फी (Bathroom Selfie) पोस्ट केली आहे. तसेच बाथरूममध्ये फोटो काढणं आता काही नवीन गोष्ट आहे का? असाही प्रश्न तिनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विचारला आहे.
धनश्री वर्माच्या पोस्टवर मजेदार कमेंट
धनश्री वर्मानं पोस्ट केलला या फोटोला खूप लोकांनी पसंती दर्शवली आहे. तसेच अनेकांनी या फोटोवर मजेदार कमेंटही केल्या आहेत. युजर्स तिच्या या फोटोवर सुंदर, छान अशा शब्दात प्रतिक्रिया देत आहेत. तर, काहींनी काय वहिणी! अशाही कमेंट केल्या आहेत. धनश्री वर्मा तिचा पती युजवेंद्र चहलसोबत भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर होती. या दौऱ्यातील अनेक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. धनश्री वर्मा एक कोरियोग्राफर आहे. तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रसोबतही अनेक व्हिडिओ बनवले आहेत.
इन्स्टाग्राम पोस्ट-
धनश्रीच्या व्हिडिओला मोठी पसंती
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी धनश्रीनं लेटेस्ट ट्रेन्ड 'गोमी गोमी'वर डान्सचा व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओला मोठी पसंती मिळाली होती. विशेष म्हणजे, 50 लाखाहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. धनश्रीनं लॉकडाऊन दरम्यान 2020 मध्ये युजवेंद्र चहलसोबत लग्नाची गाठ बांधली होती. तसेच धनश्री युजवेंद्र चहलला चीअर्स करण्यासाठी वारंवार आयपीएल आणि भारतीय संघाच्या सामन्यांमध्ये हजेरी लावते.
हे देखील वाचा-
- Video: पाकिस्तानच्या यासिर शाहची शेन वार्नशी तुलना, श्रीलंकेविरुद्ध टाकला 'बॉल ऑफ द सेंचुरी', पाहा व्हिडिओ
- KL Rahul Vs Jhulan Goswami: नेटमध्ये झुलन गोस्वामीची केएल राहुलसमोर घातक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
- Commonwealth Games 2022: विश्वचषकात महिला हॉकी संघाचं खराब प्रदर्शन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा