KL Rahul Vs Jhulan Goswami: भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) गेल्या काही दिवसांपासून संघाबाहेर. दुखापतीमुळं तो इग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही. राहुलनं जर्मनी येथे दुखापतीवर उपचार घेतले होते. त्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार सराव करत आहे. केएल राहुल सध्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) सराव करत आहे.सध्या सोशल मीडियावर (Socia Media) एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात केएल राहुल भारताची स्टार महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) गोलंदाजीवर सराव करताना दिसत आहे. 


राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत केएल राहुल जोरदार सराव करत आहे. भारतीय संघात लवकरात लवकर पुनरागमन करण्यासाठी तो मेहनत घेताना दिसत आहे. केएल राहुल आशिया कपदरम्यान भारतीय संघात एन्ट्री करेल. याचदरम्यान, केएल राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात केएल राहुल फलंदाजी करत आहे. तर, झुलन गोस्वामी त्याला गोलंदाजी करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकरी झुलन गोस्वामीचं कौतूकही करत आहेत. 


व्हिडिओ- 



केएल राहुलची कारकिर्द
केएल राहुलनं भारतीय संघासाठी आतापर्यंत 42 एकदिवसीय आणि 43 कसोटी सामने खेळले आहेत. राहुलनं एकदिवसीय सामन्यात पाच शतक आणि दहा अर्धशतकांच्या मदतीनं 1 हजार 634 धावा केल्या आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 2 हजार 547 धावा केल्या आहेत. ज्यात सात शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करेल का? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.


हे देखील वाचा-