एक्स्प्लोर

Ind vs Aus 2nd T20 : कागदावरचे वाघ मैदानात फेल! अभिषेक शर्मा एकटा नडला अन् भारी पण पडला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं पहिलं अर्धशतक

Ind Vs Aus 2nd T20 : अभिषेक शर्माने या बिकट परिस्थितीत खऱ्या अर्थाने लढाऊ खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Ind Vs Aus 2nd T20 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अत्यंत खराब सुरुवात झाली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने केवळ 40 धावांवर चार गडी गमावले. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने सुरुवातीपासूनच कहर माजवत एकाच षटकात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना माघारी धाडले. टीम इंडियाची अशी खराब सुरूवात टी20 सामन्यांत फार कमी वेळा पाहायला मिळाली आहे.

अभिषेक शर्मा एकटा नटला अन् भारी पण पडला

अभिषेक शर्माने या बिकट परिस्थितीत खऱ्या अर्थाने लढाऊ खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले, तर एकूण टी20 करिअरमधील सहावे. फक्त 23 चेंडूंवर अर्धशतक ठोकत अभिषेकने संयम आणि आक्रमण यांचा सुंदर मिलाफ दाखवला. त्याच्या या खेळीने टीम इंडियाला पुन्हा उभारी मिळवून दिली.

जोश हेजलवूडचा कहर 

जोश हेजलवूडने भारतीय डावाच्या सुरुवातीलाच धक्कादायक मारा केला. त्याने पहिल्या सहा षटकांतच तीन विकेट घेतल्या, ज्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे महत्त्वाचे विकेट्स होते. एक दिवसांच्या मालिकेत जशी हेजलवूडची लय होती, तशीच ती या सामन्यातही कायम राहिली. सूर्यकुमार यादवला त्याने अशा चेंडूवर बाद केले की ज्याला खेळणे जवळपास अशक्यच होते. तर शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांनी घाईघाईत फटकेबाजी करून आपली विकेट गमावली.

गिल आणि तिलक दोघेही अपयशी

शुभमन गिलने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मिड-ऑफवर मिचेल मार्शच्या हाती सोपा झेल दिला. तिलक वर्माने मात्र एक बेफिकीर फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून थेट विकेटकीपर जोश इंग्लिसकडे गेला. हेजलवूडने आपल्या पहिल्या तीन षटकांत केवळ 6 धावा देत 3 विकेट घेतल्या.

संजू सॅमसनलाही जमले नाही

तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आसेसा संजू सॅमसनला काही विशेष करता आले नाही. नॅथन एलिसने त्याला केवळ 4 चेंडूंवर 2 धावांवर बाद केले. त्यानंतर ऑलराउंडर अक्षर पटेलने अभिषेकसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो 7 धावांवर धावबाद झाला. या विकेटनंतर भारताचा स्कोर 8 षटकांत 50 धावांवर 5 विकेट असा झाला आणि संघ पुन्हा संकटात सापडला.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन -

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन -

मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Video: शिवसेनेचे प्रवक्ते होताच प्रकाश महाजन भाजपवर तुटून पडले; म्हणाले, भाजपला मुंडे-महाजनांची गरज नाही
Video: शिवसेनेचे प्रवक्ते होताच प्रकाश महाजन भाजपवर तुटून पडले; म्हणाले, भाजपला मुंडे-महाजनांची गरज नाही
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Video: शिवसेनेचे प्रवक्ते होताच प्रकाश महाजन भाजपवर तुटून पडले; म्हणाले, भाजपला मुंडे-महाजनांची गरज नाही
Video: शिवसेनेचे प्रवक्ते होताच प्रकाश महाजन भाजपवर तुटून पडले; म्हणाले, भाजपला मुंडे-महाजनांची गरज नाही
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
Embed widget