IND vs SA: राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतानं 82 धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. दरम्यान, चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) दमदार कामगिरी केली. भारताच्या सलग दुसऱ्या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं एक मीम्स सोशल मीडियावर शेअर केलंय. या मीम्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
भारताच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागनं प्रसिद्ध वेबसीरिज ‘स्कॅम 1992’ मधील अभिनेता प्रतीक गांधीचा प्रसिद्ध डॉयलॉग शेअर केलाय. ज्यावर “अब खेलने का नहीं *** का टाईम है.” असं लिहलंय. “आज पहिल्या हाफमध्ये डीके आणि त्यानंतर आवेश खान (Avesh Khan), ज्यांचे पहिले तीन सामन्यात विकेट न घेतल्यामुळं त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते, भारतीय संघानं शानदार विजय मिळवला", असंही वीरेंद्र सेहवागनं ट्विटमध्ये म्हटलंय.
वीरेंद्र सेहवागचं ट्वीट-
तब्बल 16 वर्षानंतर दिनेश कार्तिकचं टी-20 मध्ये अर्धशतककार्तिक भारताच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा (1 डिसेंबर 2006) भाग होता. त्यानं जोहान्सबर्गमध्येच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यानं 28 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली होती. पण 16 वर्षांनंतर कार्तिकने पहिले आणि सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकनं 27 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता.
भारताचा 82 धावांनी विजयया सामन्यातही दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकलं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सुरुवातीपासूनच ठराविक अंतरानं विकेट्स गमावणं सुरूच ठेवलं. दक्षिण आफ्रिकेकडून रासी व्हॅन डेर डुसेननं सर्वाधिक 20 धावा केल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 87 धावांत ऑलआऊट झाला आणि भारतानं हा सामना 82 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला.
हे देखील वाचा-
- On This Day: वन मॅन शो! कपिल देवच्या ऐतिहासिक खेळीला 39 वर्ष पूर्ण, नाबाद 175 धावा करून वेधलं जगाचं लक्ष
- IND vs SA: 'पुढच्या सामन्यात उजव्या हातानं नाणं फेकणार' चारही सामन्यात नाणेफेक गमावलेल्या ऋषभ पंतची मजेदार कमेंट!
- Avesh Khan: राजकोट टी-20 सामन्यात चार विकेट्स घेऊन आवेश खानचं वडिलांना बर्थडे गिफ्ट!