Ravichandran Ashwin Catch Video : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ सध्या बऱ्यापैकी मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 171 धावांवर 9 विकेट गमावल्या. त्यांची आघाडी केवळ 143 धावांची आहे.
मुंबई कसोटीत आर अश्विन आणि जडेजाची जादू पाहिला मिळाली. याशिवाय आर अश्विनने क्षेत्ररक्षणातही आश्चर्यकारक झेल घेत सर्वांनाच चकित केले. झाले असे की, दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेल चांगली फलंदाजी करत होता. विल यंग आणि मिशेल यांच्यातील 28 व्या षटकात 50 धावांची भागीदारी जवळपास पूर्ण झाली होती. याच षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मिशेल मोठा शॉट खेळायला गेला, पण आर अश्विनने अवघ्या 5 सेकंदात 20 मीटर मागे पळत अप्रतिम झेल घेतला. अश्विनने घेतलेला हा झेल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. कर्णधार रोहित शर्माही खुश दिसला, ज्याची रिएक्शन पण व्हायरल होत आहे.
यादरम्यान समालोचक रवी शास्त्रीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. अश्विनचा झेल आणि जडेजाची गोलंदाजी पाहून शास्त्री म्हणाले की, वरिष्ठ खेळाडू त्यांचे काम करत आहेत. उत्तम झेल. ” अश्विनच्या झेलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
वानखेडे स्टेडियमवर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व पाहिला मिळाले. न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या 235 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 88/6 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी या धावसंख्येच्या पुढे खेळताना भारतीय संघाने आपले उर्वरित सहा विकेट गमावून 177 धावा केल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 268 धावा केल्या आणि 33 धावांची आघाडी घेतली. यानंतर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी दाखवली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तोपर्यंत न्यूझीलंडने 9 गडी गमावून 171 धावा केल्या होत्या.
हे ही वाचा -