India vs New Zealand 3rd Test : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली रनआऊट झाला. वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीने 5 चेंडूंचा सामना करत 4 धावा केल्या. आता विराटच्या बॅटने फलंदाजी करणारा आणखी एक भारतीय खेळाडूही रनआऊट झाला. या फलंदाजाला एका चेंडूचा सामनाही करता आला नाही आणि तो रनआऊट झाला.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 263 धावांवर ऑलआऊट झाला. आकाशदीपच्या रूपाने भारतीय संघाला शेवटचा धक्का बसला. रविचंद्रन अश्विनची विकेट पडल्यानंतर बॅटींग  आकाशदीप आला होता. पण एक ओव्हर झाल्यानंतर त्याने ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीची बॅट मागितली. मात्र, विराटची बॅट आकाशदीपसाठी अशुभ ठरली आणि कोहलीप्रमाणेच आकाशदीपही धावबाद झाला. 






झाले असे की, 60 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने एक शामदार शॉट मारला आणि तो धावा काढण्यासाठी पळाला. त्याने पहिली धाव पटकन पूर्ण केली आणि दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न सुरू केला. पण नंतर त्याने धावण्यास नकार दिला. पण आकाशदीप क्षेत्ररक्षकाकडे ढुंकूनही पाहत नव्हता. 


त्यादरम्यान, रचिन रवींद्रने थ्रो केले आणि यष्टिरक्षक टॉमने विकेट्स उडावल्या. आधी आकाश सहज पोहोचल्याचे दिसत होते, मात्र रिप्लेमध्ये त्याची बॅट क्रीजच्या बाहेर असल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत तो एकही चेंडू न खेळता पॅव्हेलियनमध्ये परतला आणि डायमंड डकचा बळी ठरला. एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद होतो तेव्हा त्याला डायमंड डक म्हणतात.


याआधी भारताच्या पहिल्या डावात विराट कोहलीही धावबाद झाला होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी कोहली 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात होता, पण मॅट हेन्रीच्या शानदार थ्रोने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नुकतेच विराट कोहलीने आपली बॅट आकाशदीपला दिली होती.






हे ही वाचा -


Ind vs Nz 3rd Test : आरा....रा...रा... खतरनाक! असा चेंडू फेकला की एका सेकंदात दांडी गुल्ल, आकाशदीपनं किवी कर्णधारला दिवसा तारे दाखवले


Sarfaraz Khan IND vs NZ : मुंबईचा 'हिरो' घरच्या मैदानावर ठरला 'झिरो'; टीम मॅनेजमेंटच्या चुकीमुळे सर्फराज खान शून्य आऊट?