Sarfaraz Khan IND vs NZ 3rd Test : पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 11 धावा आणि दुसऱ्या डावात 9 धावा वानखेडेवर खाते न उघडता आऊट. शेवटच्या तीन डावांवर नजर टाकून तुम्हीही म्हणाल की सर्फराज खानला मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला नाही. पण सत्य हे आहे की संघ व्यवस्थापन युवा फलंदाजासोबत एक वेगळा खेळ करत आहे. बंगळुरूमध्ये 150 धावांची इनिंग खेळणारा सर्फराज असाच अपयशी ठरत असेल, तर त्यामागे भारतीय संघाचे निर्णयही कारणीभूत आहेत.


आता तुम्हीही विचार करत असाल की सर्फराजच्या बॅटमधून धावा येत नसतील तर यात संघ व्यवस्थापनाचा काय दोष आहे. बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सर्फराजने दोन्ही डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. दुसऱ्या डावातही सर्फराजने 150 धावांची दमदार खेळी केली. मात्र, शानदार खेळी करूनही दुसऱ्याच कसोटी सामन्यात सर्फराजच्या क्रमवारीत बदल केला.


पुणे कसोटीच्या पहिल्या डावात सर्फराज सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 11 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात सर्फराजला एका स्थानावर खाली ढकलण्यात आले आणि तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी सर्फराज 9 धावा करून आऊट झाला.




मुंबई हे रोहित शर्मा तसंच सर्फराज खानचं होम ग्राउंड आहे. हे लक्षात घेऊन सर्फराजला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळायला हवी होती, कारण या मैदानावर सर्फराजच्या बॅटमधून अनेक संस्मरणीय खेळी पाहिला मिळाल्या आहेत. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाने याच्या उलट केले. रवींद्र जडेजाला फलंदाजीच्या क्रमाने त्याच्या वरती बढती देण्यात आली. सहा विकेट्स बाद झाल्यानंतर सर्फराज मैदानात आला, पण खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे सर्फराजसोबत खेळ का होत आहे, हा प्रश्न पडत आहे.




तिसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 235 धावा केल्या. या अर्थाने टीम इंडियाला 28 धावांची आघाडी मिळाली आहे. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 90 धावा केल्या. तर ऋषभ पंतने तो 59 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने शेवटी काही मोठे फटके मारले आणि भारताला आघाडी मिळवून दिली. त्याने 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने पाच विकेट घेतल्या. तर मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली.


हे ही वाचा -


मुंबई कसोटीत शुभमन गिल, पंतचा पलटवार, भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपला! न्यूझीलंडवर घेतली 28 धावांची आघाडी